Green chicken: रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते.नॉनव्हेज आवडणाऱ्या लोकांना चिकनसारखे विविध प्रकारचे पदार्थ खायला आवडतात. मग ते ग्रील्ड चिकन असो की चिकन करी किंवा मसाला चिकन किंवा चिली चिकन, या पदार्थांचा आस्वाद मांसाहारी प्रेमी मोठ्या थाटामाटात घेतात.तुम्हालाही तुमचा रविवार स्पेशल करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल चमचमीत अशी चिकन रेसिपी घेऊन आलो आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रीन चिकन साहित्य –

  • अर्धा किलो चिकन
  • १ वाटी हिरवे वाटण(आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर)
  • १ चमचा गरम मसाला
  • २ मोठे बटाटे, गोल चकत्या करुन घ्या
  • १ चमचा गरम मसाला, १ चमचा लाल तिखट,
  • १ चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद
  • चवीनुसार मीठ, २ चमचे तेल.

ग्रीन चिकन कृती –

सर्वप्रथम चिकन धुवुन घ्या. बटाट्याच्या चकत्या आणि चिकन एकत्र करुन त्याला हिरवे वाटण, हळद, मीठ लावून घ्या. कढईत तेल गरम करा. आता त्यात चिरलेला कांदा घाला. कांदा चांगला भाजून झाल्यावर त्यात प्री-मॅरिनेट केलेले चिकन घालून शिजू द्यावे. थोड्या वेळाने गरम मसाला, लाल तिखट, मीठ, धनेपूड आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा. त्यावर हे चिकन टाकून झाकण ठेवा. त्यावर थोडे पाणी ठेवून वाफेवर हे चिकन शिजवून घ्या. तांदळाच्या भाकरीबरोबर गरमागरम वाढा.

पाहा रेसिपी व्हिडीओ –

हेही वाचा – अस्सल मराठवाडी चवीचा मटण काळा रस्सा, जाणून घ्या सोपी रेसिपी

आज नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.