Sunday Special Non Veg Dish: आपल्याकडे रविवार आणि नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश घरांमध्ये असतं. सुट्टीच्या दिवशी घरच्यांसह चमचमीत नॉन व्हेज खाण्याची मज्जाच काही और असते. शनिवारी रात्री उद्या जेवणामध्ये काय बनणार हे ठरत असते. त्याशिवाय सकाळी उठून बाजारातून चिकन/ मटण कोण आणणार ही ड्युटी सुद्धा लागते. रविवारच्या दुपारी मस्त जेवण करुन घरातल्या लोकांबरोबर गप्पा मारल्याने आठवड्याचा थकवा नाहीसा होतो. पण काही वेळेस रविवारी जेवणात काय बनवू असा प्रश्न घरात्या गृहिणीला पडतो. तेच ते पदार्थ खाऊन घरातले सगळेजण कंटाळले असतात. अशा वेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही ‘कोंबडा आणि तिरपण’ बनवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिरपण साहित्य

  • १ वाटी कलेजी
  • १ पोटा एका ओल्या नारळाचे तुकडे
  • ४ मोठे चमचे तेल
  • मीठ चवीनुसार

कृती

  • कलेजी, पोटा बारीक कापून घ्या.
  • पातेल्यात तेल गरम करा.
  • त्यात हे बारीक केलेले तुकडे टाकून एक वाफ आणा.
  • नंतर त्यात नारळाचे तुकडे टाका.
  • पुन्हा १० ते १५ मिनिटे झाकण ठेवून शिजवा.

Sunday Special: रविवारी करा खास नॉन व्हेजचा बेत; जेवणात बनवा मसालेदार खिमा भरलेली अंडी, लगेच नोट करा परफेक्ट रेसिपी

साहित्य

  • १ मध्यम आकाराचा कोंबडा
  • २ मोठे कांदे
  • २ लहान बटाटे
  • २ मोठे चमचे आलं-लसूण वाटण
  • ३ मोठे चमचे आगरी मसाला
  • अर्धा चमचा हळद
  • १ मोठा चमचा गरम मसाला
  • अर्धी वाटी भाजलेले सुक्या खोबऱ्याचं वाटण
  • ४ मोठे चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • अर्धी वाटी तेल
  • मीठ चवीनुसार

कृती

  • कोंबडा गरम पाण्यात साफ करून आगीवर भाजून घ्या. त्याचे मध्यम तुकडे करा.
  • पातेल्यात तेल गरम करून त्यात आलं-लसूण वाटण परतवा. त्यात कांदा टाकून लाल करा.
  • नंतर त्यात चिकन टाकून एक वाफा आणा. ते शिजत आल्यावर त्यात सर्व मसाले व बटाटे टाका.
  • कोथिंबीर-खोबऱ्याचे वाटण टाका व एक वाफ आणा.

आणखी वाचा – आमरस काळा पडू नये यासाठी ‘या’ ट्रिक्सची घ्या मदत; आंब्याचा सीझन संपल्यावरही खा रसाळ आमरस

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunday special how to make tirpan at home know kombada and tirpan recipe in marathi yps
Show comments