Sunday Special Chicken Peri Peri Recipe In Marathi: रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण आपल्याला बऱ्याचजणांकडे पाहायला मिळते. सुट्टीच्या दिवशी कामावर जाणारे वयस्कर लोक, शाळा-कॉलेजमधील मुल असे सर्वजण घरी असतात. दर रविवारी घरी नॉन व्हेज बनत असल्याने गृहिणींना अनेकदा या रविवारी काय बनवू असा प्रश्न पडतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही चिकन पेरी पेरी हा पदार्थ बनवू शकता. ही हॉटेल स्टाइल डिश लहानांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सर्वांना आवडते. शिवाय यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये मिळणारा हा पदार्थ काही मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवता येतो.

साहित्य :

  • चिकन लेग पीस
  • २ लाल सिमला मिरच्या
  • २ लाल साध्या मिरच्या
  • १ चमचा काश्मिरी लाल मिरची पूड
  • १ चमचा पॅप्रिका पूड
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • २ चमचे व्हिनेगार
  • ४ चमचे ऑलिव्ह तेल
  • १ पांढरा कांदा
  • चवीनुसार मीठ

कृती :

  • कांदा, मिरच्या चिरून घ्याव्यात. लसूण ठेचून घ्यावी.
  • सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
  • ही तयार झालेली चटणी चिकन लेग पीसना लावून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी.
  • यानंतर ग्रील पॅनवर हे लेग पीस दोन्ही बाजूनी भाजून घ्यावे. कांद्यासोबत सव्‍‌र्ह करावे.

आणखी वाचा – Weekend Special: हॉटेल स्टाइल हरियाली चिकन बनवून घरच्यांना करा खुश; लिहून घ्या सोपी रेसिपी

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)

Story img Loader