Sunday Special Chicken Peri Peri Recipe In Marathi: रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण आपल्याला बऱ्याचजणांकडे पाहायला मिळते. सुट्टीच्या दिवशी कामावर जाणारे वयस्कर लोक, शाळा-कॉलेजमधील मुल असे सर्वजण घरी असतात. दर रविवारी घरी नॉन व्हेज बनत असल्याने गृहिणींना अनेकदा या रविवारी काय बनवू असा प्रश्न पडतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही चिकन पेरी पेरी हा पदार्थ बनवू शकता. ही हॉटेल स्टाइल डिश लहानांपासून वयस्कर मंडळींपर्यंत सर्वांना आवडते. शिवाय यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये मिळणारा हा पदार्थ काही मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवता येतो.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य :
- चिकन लेग पीस
- २ लाल सिमला मिरच्या
- २ लाल साध्या मिरच्या
- १ चमचा काश्मिरी लाल मिरची पूड
- १ चमचा पॅप्रिका पूड
- ७-८ लसूण पाकळ्या
- २ चमचे व्हिनेगार
- ४ चमचे ऑलिव्ह तेल
- १ पांढरा कांदा
- चवीनुसार मीठ
कृती :
- कांदा, मिरच्या चिरून घ्याव्यात. लसूण ठेचून घ्यावी.
- सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
- ही तयार झालेली चटणी चिकन लेग पीसना लावून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावी.
- यानंतर ग्रील पॅनवर हे लेग पीस दोन्ही बाजूनी भाजून घ्यावे. कांद्यासोबत सव्र्ह करावे.
(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)
First published on: 11-06-2023 at 14:01 IST
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunday special non veg dish chicken peri peri recipe in marathi try it at home know full cooking process and ingredients yps