पापलेट मासा कसा दिसतो, असं माहित नसणारा माणूस सापडणे कठीण आहे. पापलेट मासा सर्वांनाच खायला आवडतो. याला इंडियन बटर फिश देखील म्हणतात. हा मासा खायला चवदार आहे. पापलेटमध्ये अन्न शोषणासाठी असणारे प्रथिनं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅट्टी अॅसिड देखील यात मिळतं. मात्र, आम्ही तुमच्यासाठी आज पापलेटची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही बिर्यानी, चिकन राइस, मटण राइस खाल्ला असेल, मात्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पापलेट राइस. हा राइस बनवून तुमचा रविवार नक्की स्पेशल होईल. चला तर पाहुयात पापलेट राइस कसा बनवायचा.
पापलेट भात साहित्य
- २ मोठी पापलेट, २ वाटी कोलम
- मोठे कांदे, २ लहान टोमॅटो
- वाटलेली लाल मिरची
- २ मोठे चमचे अल-लसूण वाटण,
- १ चमचा हळद, २ मोठे चमचे बिर्याणी मसाला
- ४ मोठे चमचे तेल, अर्धा चमचा लिंबूरस
- मीठ चवीनुसार
पापलेट भातकृती –
पापलेटचे तुकडे करून लिंबूरस, हळद लावून १५ मिनिटे ठेवा. पातेल्यात तेल गरम करा. त्यात कांदा लाल करा. नंतर त्यात आलं-लसूण वाटण, टोमॅटो, लाल मिरची वाटण, बिर्याणी मसाला टाका. थोडे मीठ टाकून सस्सा चांगला शिजवून घ्या. नंतर त्यावर पापलेट इकडे ठेवून वरून भात पसरवा आणि झाकण वून एक वाफ आणा.
तेच ते पदार्थ खाऊन घरातले सगळेजण कंटाळले असतात. अशा वेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही पापलेट राइस बनवून जिभेला ट्रीट देऊ शकता.