Mutton recipe: रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते. अशा वेळी मटणाचा बेत करायचा विचार हमखास मनात येऊ शकतो. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातील मटणाची सोपी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

साहित्य:

  • १ किलो मटण
  • ४ मोठे बटाटे
  • ३ कांदे
  • ३ टॉमेटो
  • ४ तमालपत्र
  • मोहरी तेल ३ डाव
  • १ लहान चमचा मिरी
  • १ चमचा साजूक तूप
  • मीठ चवीनुसार

मसाला तयार करण्यासाठीचे साहित्य:

  • २ मध्यम आकाराचे कांदे
  • २ लसणीचे गड्डे
  • दोन बोटभर आलं
  • १ लहान चमचा जिरेपूड
  • १ लहान चमचा धणेपूड
  • १ लहान चमचा तिखट
  • २ लहान चमचे हळद

कृती:

मटण स्वच्छ करुन, त्याच्या तुकड्यांना १ लहान चमचा तेल हळद व मीठ लावून ठेवा. एका बटाट्याचे ४ लांब तुकडे असे सर्व बटाटे चिरुन तेलात तळून घ्या. टॉमेटो बारीक तिरा. कांदे पातळ उभे चिरा. कांदा, लसूण व आलं वाटून घ्या. प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवा. ते झाल्यावर त्यामध्ये मिरे घाला. ते तडतडायला लागले की, कांदा व तमालपत्र घालून परता. कांद्याचा रंग जरासा बदलत असल्याचे कळताच त्यात वाटलेला मसाला घाला. गॅस बारीक करा. टॉमेटो घालून चांगले शिजू द्या. हळद, जिरेपूड, धणेपूड व तिखट घाला. नंतर मीठ घालून परता. अर्धी वाटी पाणी घालून मसाला चांगला शिजू द्या. झाकण ठेवा. मसाल्याला तेल सुटू लागल्यावर मटणाचे तुकडे घालून चांगले खालीवर ढवळा. दीड वाटी पाणी घालून पुन्हा चांगले ढवळून गॅस मोठा करा. कुकरचे झाकण बंद करुन तीन ते चार शिट्या काढा. गॅस बंद करा. झाकण निघाले की तयार पदार्थाला ‘मांस कसा’ म्हटले जाते. पुढे त्यात ३ वाट्या पाणी घालून परत गॅस सुरु करा,. उकळी फुटल्यावर त्यात तळलेला बटाटा सोडा. परत झाकण लावून एक शिटी काढा आणि गॅस बंद करा. झाकण उघडल्यावर परत एकदा गॅस लावून कुकर त्यावर ठेवा. चमचाभर तूुप सोडून कोथिंबीर घालून झाकण ठेवा आणि गॅस बंद करा.

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
How to make Methi Kadhi marathi Methi Kadhi recipe marathi Methi Kadhi recipe
थंडीत वाफाळत्या भातासोबत खा पौष्टिक ‘ मेथीची कढी’! खास रेसिपी
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”
Story img Loader