काहींना रोजचं साधं जेवण खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा काही तरी वेगळं तसेच व्हेज-नॉनव्हेज खाण्याची तल्लफ येते. त्यावेळी कुणी मटण, कुणी चिकन, कुणी बिर्याणी तर कुणी फिश खाण्याला पसंती देतात. त्यात अनेकांना फिश आवडतंच असेल.नॉनव्हेज खाणारी माणसं चिकन, मटण तर कधी मच्छीवर ताव मारतात. गोड्या पाण्यात अनेक प्रकारचे मासे असतात. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय चमचमीत अशी तव्यावरची करंदी. ही रेेसिपी बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, चला तर मग पाहुयात कशी करयाची तव्यावरची करंदी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तव्यावरची करंदी साहित्य –

  • सुकी करंदी २ कप
  • कांदे ४, लसूण ८ पाकळ्या
  • मिरची २ नग, चिंचेचा कोळ २ मोठे चमचे
  • कोथिंबीर ४ मोठे चमचे, मसाला ३ मोठे चमचे
  • हळद १ चमचा, मीठ चवीनुसार, तेल

तव्यावरची करंदी कृती –

सर्वप्रथम एक खोलगट तवा गरम करा. त्यात तेल टाका. गरम झाल्यानंतर लसणाचे तुकडे, उभ्या चिरलेल्या मिरच्या व नंतर भिजवलेली करंदी टाका. त्यात कांदा टाकून चांगली परतवून घ्या. नंतर त्यात हळद, मसाला टाकून एक वाफ आणा. शेवटी चिंचेचा कोळ व बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. आपली तव्यावरची मसालेदा झणजणीत अशी करंदी खाण्यासाठी रेडी आहे.

हेही वाचा – Sunday special: ‘पापलेट राइस’; या रेसिपीनं तुमचा रविवार नक्की स्पेशल होईल

ही करंदी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत तर उत्तम. तसेच पावासोबतही फार टेस्टी लागते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunday special spicy fish karandi recipe in marathi srk