दीपा पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

सुरमई १ किलो, ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ मोठे कांदे, अर्धी वाटी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, १०-१२ कढीपत्ता पाने, चमचाभर आले-लसूण वाटण, लिंबूरस, २ चमचे धने पूड, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मेथी दाणे, मीठ, तेल.

कृती :

पहिल्यांदा सुरमई स्वच्छ धुऊन आणि चिरून घ्यावी. एका कढईत तेल गरम करून त्यात मेथी दाणे, जिरे, कढीपत्ता परतून घ्यावा. यानंतर कांदा बारीक चिरून तोही लालसर होईपर्यंत परतावा. त्यात आले-लसणीचे वाटण घालावे. टोमॅटोचा रस काढून तोही त्यात घालावा.नंतर त्यात तिखट, हळद, गरम मसाला, धने पूड घालावी. हे मिश्रण थोडे परतून शिजल्यावर त्यात माशाचे तुकडे घालून परतावे. थोडे पाणी घालून झाकण ठेऊन त्याला एक वाफ आणावा. शेवटी लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. गरमगरम भातासोबत हा माशाचा रस्सा फस्त करावा.