Starter fish recipes: तुम्हाला मासे खाणं आवडत असेल तर तुम्हाला फिश फ्राय नक्कीच आवडेल. ही कुरकुरीत सुरमई पॅटीसची रेसिपी इतकी चवदार आहे, की एकदा खाऊन तुमचं मन अजिबातच भरणार नाही. मासे केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही असतात. मासे पचण्यासही हलके असतात. आहारतज्ञही मटण-चिकनच्या तुलनेत मासे खाण्यास सांगतात. चला तर मग आज पाहुयात स्टार्टर कुरकुरीत सुरमई पॅटीस रेसिपी कशी बनवायची…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुरकुरीत सुरमई पॅटीस साहित्य

२ सुरमई चे पीस
१ कांदा
१ बॉईल बटाटा
२ चमचे आलं लसूण मिरची पेस्ट
१ चमचा लिंबाचा रस
चवीप्रमाणे मीठ
थोडी कोथिंबीर
१/२ चमचा हळद
१ अंड
थोडा रवा
तवा फ्राय साठी तेल

कुरकुरीत सुरमई पॅटीस कृती

१. प्रथम सुरमईचे तुकडे स्वच्छ धुऊन घ्या मग बॉईल करून घ्या. हे सुरमईचे तुकडे थंड झाल्यावर त्याचे मास काढून एका भांड्यात घ्यावे. नंतर त्यात कांदा, बटाटा, कोथिंबीर, हळद, मसाला, मीठ व लिंबाचा रस घालावा.

२. हे सगळं मिश्रण चांगले एकजीव करून त्याचा गोळा बनवावा. नंतर त्या मिश्रणाचे छोटे छोटे पॅटीस करून फेटलेल्या अंड्यात बुडवून घ्यावेत.

३. अंड्यात बुडवल्यानंतर त्याला दोन्ही बाजूने चांगला रवा लावून सगळे तयार करून घेणे. त्यानंतर मंद आचेवर गॅसवर तवा ठेवून छोटे पॅटीस शॅलो फ्राय करणे.

हेही वाचा >> विदर्भ स्पेशल: नुसत्या सुगंधानेच खावेसे वाटेल असे ‘फोडणीचे वरण’; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

४. दोन्ही बाजूने चांगले गोल्डन कलर झाल्यावर कुरकुरीत सुरमई पॅटीस सर्व्ह करण्यास तयार आहे. गरमा गरम रेसिपीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.

 (ही रेसिपी कूकपॅडवरुन घेतली आहे.)