Sweet Appe Recipe In Marathi: बहुतांश मराठी घरांमध्ये मंगळवारी गोड पदार्थ केले जातात. हा दिवस गणपतीचा वार असतो असे अनेकजण मानत असतात. त्यामुळे मंगळवारी साध्या पद्धतीने जेवण बनवले जाते. जेवणासह नाश्त्यामध्येही काहीसे गोड पदार्थ खाल्ले जातात. आपल्याकडे गोड पदार्थ म्हटल्यावर शिरा, शेवया असे पदार्थ डोळ्यासमोर येतात. पण हे पदार्थ आपण नेहमीच खात असतो. त्यामुळे नाश्तामध्ये काहीतरी वेगळं खाण्याचा विचार करत असल्यास तुम्ही गोड आप्पे हा पदार्थ ट्रॉय करु शकता. बऱ्याचजणांकडे तिखट आप्पे खाल्ले जातात. त्यांना गोड आप्पे कसे तयार करायचे हे ठाऊक नसते. अशा लोकांसाठी आम्ही लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून गोड आप्पे ही सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत.
आप्पे म्हणजे झटपट तयार होणारा नाश्ता. यात गोडासाठी कधी गूळ, कधी काकडी तर कधीकधी पिकलेली केळी घालता येतात. आवडीनुसार त्यात काजू, मनुके अशा गोष्टी टाकता येतात.
साहित्य :
- पाऊण वाटी जाड रवा (न भाजलेला)
- गूळ (थोडा अधिक लागू शकतो – चवीनुसार घेऊन ठरवणे.)
- पिकलेली केळी
- अर्धा कप काकडी
- अर्धी वाटी जाड पोहे
- पाव वाटी ओलं खोबरं (ऐच्छिक)
- पाव वाटी मैदा किंवा कणिक
- एक छोटी वाटी आंबट दही
- वेलची पूड, काजू आवडीनुसार
कृती :
- रवा, पोहे, दही, कणिक, खोबरं, गूळ हे सर्व एकत्र करुन घ्या.
- परंतु ते मिश्रण फार कुस्करु नका. सर्वात शेवटी त्यात केळ्याचे तुकडे घाला.
- मिश्रण चमच्याने एकजीव करुन त्यात काजू, मनूका, वेलची टाका.
- आप्पे पात्राला तुपाचा हात लावून छोट्या चमच्याने आप्पे घालून खरपूस लालसर करुन घ्या.
आणखी वाचा- कारल्याची स्वादिष्ट चिंच गुळाची भाजी! रात्रीच्या जेवणात करा पौष्टिक बेत, वाचा सोपी रेसिपी
हा पदार्थ पटकन तयार होत असल्यामुळे लहान मुलांना संध्याकाळी नाश्ता म्हणून आप्पे खाऊ घालू शकता. हा पदार्थ चविष्ट असण्याबरोबरच आरोग्यदायी देखील आहे.