Sweet recipe: कधी कधी आपल्याला नाश्त्यात गोड खाण्याची ईच्छा होते. अशावेळी तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी स्वादिष्ट अशी गोड रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही आतापर्यंत पुरनपोळी, साखरेची पोळी खाल्ली असेल मात्र आज आम्ही घेऊन आलो आहोत बदाम पोळी. आपल्याकडे गोड पदार्थ म्हटल्यावर शिरा, शेवया असे पदार्थ डोळ्यासमोर येतात. पण हे पदार्थ आपण नेहमीच खात असतो. त्यामुळे नाश्तामध्ये काहीतरी वेगळं खाण्याचा विचार करत असल्यास तुम्ही बदाम पोळी ट्राय करु शकता.
बदाम पोळी साहित्य –
- बदाम १ वाटी, साखर १ वाटीला थोडी कमी
- तूप अर्धा मोठा चमचा
- वेलची १० ग्रॅम, केशराच्या थोड्या काड्या
- मैदा २ वाटी, मीठ चवीपुरते, पाणी.
बदाम पोळी कृती-
बदाम दुधात १ ते २ तास भिजत घाला. बारीक वाटून घ्या. वाटलेल्या बदामात साखर, केशर, वेलची पूड मिसळा. पॅनमध्ये तूप घ्या. तूप गरम झाल्यावर त्यात बदाम-साखरेचे मिश्रण ओता. त्याचा गोळा होईपर्यंत मंद आचेवर हलवत रहा. गोळा झाल्यावर मिश्रण थंड होऊ द्या. भांड्यावर झाकण ठेवा. थोडे मीठ, तेल घालून मैदा भिजवा.. पिठाचे छोटे गोळे करा, बदामाच्या मिश्रणाचेही तसेच गोळे करा. मैद्याची पुरी लाटून घ्या, त्यावर बदामाचा गोळा ठेवा. तो गोळा पूर्ण झाकला जाईल असे बघा. मैदा लावून पोळी लाटा. तुप लावून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. अशाप्रकारे आपली बदाम पोळी तयार आहे.
हेही वाचा – गोडातले चिरोटे! खायला खुसखूशीत अन् बनवायला एकदम सोपे; नक्की ट्राय करा
तुम्हालाही गोड खायला आवडत असेल तर आजच नाष्ट्यासाठी ही बदाम पोळी करुन पाहा. आणि कशी होते रेसिपी हे आम्हाला नक्की कळवा.