ताडगोळे संपूर्ण उन्हाळ्यात सहज बाजारात मिळतात आणि ते आपल्या शरीरातील वाढलेली चरबी कमी करेल. तुमचं वजन कमी करण्यासाठी हे एक चांगलं सुपरफूड ठरेल. मंडळी, आपल्या शरीराचं वजन कमी करण्यासाठी अनेक सुपरफूड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे आइस ऍपल म्हणजेच ताडगोळा जो दिसायला लीचीसारखा आणि चवीला सौम्य, नाजूक, कोमल आणि कच्च्या नारळाच्या पाण्यासारखा गोड असतो. हेच ताडगोळे खाल्ल्यानं आपल्या शरीराला आवश्यक प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि साखर एकत्र मिळते. आज आम्ही तुम्हाला याच ताडगोळ्याचे वडे कसे करायचे याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया ताडगोळ्याचे वडे कसे बनवायचे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झटपट वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ वाटी ताडगोळे
  • ताडगोळ्याचा गराचा लगदा, १ वाटी तांदळाचे पीठ
  • पाव वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी ओले खोबरे,
  • अर्धी वाटी गूळ, वेलची पूड किंवा जायफळ पूड
  • बदाम-काजूचे तुकडे (बारीक करून) अर्धी वाटी पाणी
  • १ चमचा तूप, चवीपुरता मीठ, तेल.

ताडगोळ्याचे वडे कृती-

ताडगोळ्याचा गराचा लगदा, मीठ, पाणी, लगदा, नारळ, गूळ, तूप एकत्र करून भाकरीच्या पिठाप्रमाणे उकड घालून उकड चांगली वाफवून घ्या. त्यात वेलची पूड टाकून उकड चांगली मळून त्याचे लहान गोळे करून हाताला तेल लावून किंवा पोळपाटावर पुरी एवढे लाटून तेलात खरपूस तळून घ्या.

Sweet dish: नाश्त्याला काहीतरी गोड खायचंय? ही ‘बदाम पोळी’ नक्की ट्राय करा

तुम्हालाही गोड खायला आवडत असेल तर आजच नाष्ट्यासाठी हे तोडगोळ्याचे वडे नक्की करुन पाहा. आणि कशी होते रेसिपी हे आम्हाला नक्की कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadgolyache vade easy recipe in marathi srk
Show comments