चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय.विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. चला तर मग पाहुयात चमचमीत आणि तितकाच चवदार पदार्थ खास विदर्भ स्पेशल टमाटर लुंजी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टमाटर लुंजी साहित्य

  • ८ टोमॅटो
  • १/२ चमचा हिंग
  • चमचा गरम मसाला दीड
  • चमचा लाल तिखट दीड
  • १/२ चमचा धनेजिरे पूड
  • आलं लसूण पेस्ट २ चमचे (६ लसूण पाकळ्या व एक इंच आलं)
  • कोथिंबीर
  • ५-६ कडीपत्ता
  • १/२ चमचा राई
  • १/२ चमचा जीरे
  • ३ चमचे तेल
  • चवीनुसार मीठ
  • १ ग्लास गरम पाणी
  • ७ हिरव्या मिरच्या
  • २ चमचा गूळ
  • २ बारीक चिरून घेतलेला कांदा
  • २ चमचा सुख खोबरे

टमाटर लुंजी कृती

स्टेप १
टोमॅटो स्वच्छ धुवून पॅन वर ठेवले. व गॅस फास्ट केला. व ५ मिनिट पुरवून घेतले.

स्टेप २
दुसऱ्या बाजूने परत ५ मिनिटे परतवून घेतली मग त्यात १ चमचा तेल टाकून ७ मिनिट मध्यम आचेवर वाफवून घेतली. मग चमचा च्या साहाय्याने शिजलेले टोमॅटो बारीक केले. पुन्हा २ मिनिट वाफवून घेतली. मिश्रण थंड होई पर्यंत दुसऱ्या बाजूला मिरच्या व आलं लसूण पेस्ट बारीक वाटून घेतले.

स्टेप ३
नंतर थंड झालेली पेस्ट मिक्सर मध्ये वाटून घेतली. जास्त बारीक करायची नाही, जाड ठेवायची.

स्टेप ४
फोडणी साठी एक पॅन ठेवून त्यात २ चमचे तेल गरम झाल्यावर फोडणीला प्रथम कडीपत्ता, राई व जीरे टाकले मग त्यात हिंग, हळद ऍड केलं मध्यम आचेवर ठेवून हे मिश्रण चांगले परतवून घेतले मग त्यात कांदा व सुखे खोबरे परतवून घेतले. सर्व मसाले कांदा शिजल्यावर ऍड केले, चवीनुसार मीठ ऍड केले. मिरची, आलं व लसूण ह्याची पेस्ट ऍड केली.

हेही वाचा >> विदर्भ स्पेशल ज्वारीची उकडपेंडी चिकट न होता कशी बनवावी? ही घ्या सोपी रेसिपी

स्टेप ५
मिश्रण चांगले शिजल्यावर त्यात टोमॅटो ची पेस्ट ऍड केली.व एक ग्लास गरम पाणी टाकून मिश्रण चांगले उकळून घेतले. मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात गूळ ऍड केलं. अश्या प्रकारे तयार टोमॅटो लुंजी किंवा पातळ भाजी.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamatar lunji recipe in marathi vidarbha special recipe in marathi srk