अचानक आपल्याला रात्री भूक लागते. अशावेळी झटपट तयार होणारी रेसिपी तर हवी असतेच सोबतच ती चविष्टही असावी असं आपल्याला वाटतं असते.अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यासाठी तांदळाचे वडे बनवू शकता. भातापासून बनवलेले हे वडे अतिशय कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम लागतात. हे वडे हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह केले जाऊ शकतात. क्रिस्पी तांदळाचे वडे बनवण्याची रेसिपी येथे जाणून घ्या.
तांदळाचे वडे साहित्य
एक वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी नाचणीचे पीठ
१ मोठा कच्चा बटाटा
१ चमचा मसाला
१/२ चमचा हळद
१ चमचा चाट मसाला
१ मोठा चमचा तीळ
१ कांदा
२ चमचे बेसन
टू पिंच खायचा सोडा
१ छोटा तुकडा आल
२ हिरव्या मिरच्या
थोडी कोथिंबीर
२ चमचे तेल
चवीप्रमाणे मीठ
फ्राय करण्यासाठी तेल
तांदळाचे वडे कृती
१. सर्वप्रथम तांदूळ आणि नाचणी पाच ते सहा तास भिजत ठेवावे. त्यानंतर ते मिक्सरमध्ये काढून त्यात एक कच्चा बटाटा सोलून छोटे तुकडे करून घालावे. त्यातच मिरची आलं घालून चांगली पेस्ट करून घ्यावी.
२. बारीक केलेली पेस्ट एका भांड्यात काढून त्यात मीठ, मसाला, हळद,चाट मसाला,हिंग, कोथिंबीर,कांदा, बेसन, तीळ व खायचा सोडा हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यावे व गॅसवर तळण्यासाठी तेलाची कढई ठेवावी.
हेही वाचा >> नैवेद्याची बटाटा भाजी; १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
३. कढईत छोटे छोटे गोळे टाकून गोल्डन कलर येईपर्यंत चांगले तळून घ्यायचे.नंतर गरमा-गरम तांदळाचे वडे याखाण्यास तयार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd