शिरवाळे, म्हणजे आत्ताच्या मुलांसाठीचे राईस नुडल्स कोकणातील अतिशय पारंपरिक पदार्थ, ज्याला तांदळाच्या शेवया, रसातल्या शेवया म्हणून पण ओळखले जाते. निसर्गनयमानुसार जे पिकते त्यातूनच निर्माण झालेला हा गोड पदार्थ.तांदळाच्या उकडीच्या गोळया पासून शेवया पडायच्या आणि नारळाच्या रसात गूळ घालून मस्त घोळवून त्या खायच्या. चला तर पाहुयात उन्हाळ्यात तयार केला जाणारा आणि वर्षभर खाल्ला जाणारा हा पदार्थ कसा बनवायचा. चला तर पाहुयात तांदळाच्या शेवया कशा बनवायच्या.
तांदळाच्या शेवया साहित्य –
- तांदळाचे पीठ २ वाट्या
- पाणी दीड वाटी
- १ मोठा चमचा, तेल अर्धा मोठा चमचा
- मीठ चिमूटभर
- दूध ४ वाटी, साखर ६ मोठे चमचे
- वेलची पूड थोडी
तांदळाच्या शेवया करण्याची पाककृती –
- तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे, नंतर दळून आणावे.
- ह्या पिठातील २ वाट्या पीठ घ्यावे..एका पातेल्यात २ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे.
- त्यात लोणी व मीठ घाला.पाण्याला उकळी आली की त्यात २ वाट्या तांदळाचे पीठ घालून, उलथन्याच्या टोकाने ढवळा.
- नंतर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी, २ – ३ वाफ आल्या की उतरवावे नंतर ही उकड ताटात काढून घ्या.
- तुपाचा किंवा पाण्याचा हात लावून चांगली मळावी, ह्या मळलेल्या उकडीचे बेताच्या आकाराचे लांबट गोळे करावे.
- मोदकपात्रात पाणी घालून त्यावर चाळण ठेवावी, चाळणीवर एखादा कपडा किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालावा.
- त्यावर हे गोळे ठेवून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावे, अंतर खाली उतरवून शेवेच्या सोऱ्याने वरील पिठाच्या शेवयाचे चवंगे तूप लावलेल्या ताटात पाडावे. रळाचे बेताचे जाडसर दूध काढा.
- ह्या मळलेल्या उकडीचे बेताच्या आकाराचे लांबट गळि करावे. मोदकपात्रात पाणी घालून त्यावर चाळण ठेवावी.
- चाळणीवर एखादा कपडा किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालावा. त्यावर हे गोळे ठेवून १० ते १५ मिनिटे वाफवून घ्यावे.
हेही वाचा – तांदळाची स्वादिष्ट तुकडा खीर, झटपट आणि सोपी कृती, चव अप्रतिम
- नंतर खाली उतरवून शेवेच्या सोऱ्याने वरील पिठाच्या शेवयाचे चवंगे तूप लावलेल्या नारळाचे बेताचे जाडसर दूध काढा.
- त्यात साखर किंवा गूळ घालून बेताचे गोड करावे. वेलदोड्याची पूड घालावी. या दुधात शेवया घालून खायला द्या.