पापलेट मासा कसा दिसतो, असं माहित नसणारा माणूस सापडणे कठीण आहे. पापलेट मासा सर्वांनाच खायला आवडतो. याला इंडियन बटर फिश देखील म्हणतात. हा मासा खायला चवदार आहे. पापलेटमध्ये अन्न शोषणासाठी असणारे प्रथिनं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅट्टी अॅसिड देखील यात मिळतं. मात्र, आम्ही तुमच्यासाठी आज पापलेटची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आतापर्यंत तुम्ही बिर्यानी, चिकन राइस, मटण राइस खाल्ला असेल, मात्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तंदूरी पापलेट फ्राय
तंदूरी पापलेट फ्राय साहित्य
३ पापलेट अखंड स्वच्छ केलेली
१/२ कप घट्ट दही
१ लिंबाचा रस
आलं लसूण पेस्ट
१ टेबलस्पून तंदूरी मसाला
१/2 टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
१ टेबलस्पून बेसन
ऑरेंज रेड फूड कलर
तांदळाचं पीठ कोटिंगसाठी
तेल
१ टीस्पून धणेपूड
तंदूरी पापलेट फ्राय कृती
१. पापलेट स्वच्छ धुवून त्या खाचे पाडून घ्या. वरून लिंबाचा रस घालून छान चोळून घ्या.
२. वाटीमधे वर दिलेले साहित्य सर्व मिश्रण छान एकत्र करा मीठ थोडं बेतातचं घाला कारण तंदूरी मसाल्याचे सुद्धा मीठ असते. त्यात कलर घालून पुन्हा छान मिक्स करा.
३. पापलेटला हा मसाला छान लावून घ्या. पोटाच्या आत देखील हा मसाला छान भरून घ्या. १० मि.झाकून ठेऊन द्या.
४. पॅनमधे तेल गरम करून पापलेट तांदळाच्या पिठामधे घोळवून घ्या. आणि दोन्ही बाजूने छान खरपूस फ्राय करून घ्या.
हेही वाचा >> ढाबा स्टाईल सोडे मसाला; एकदा खाल तर खातच रहाल अशी जबरदस्त रेसिपी, नक्की ट्राय करा
५. तंदूरी पापलेट खाण्यासाठी तयार आहे..