Navratri upvas 2023: नऊ रात्रीचे ९ दिवस उपवास करणारे उद्या उपवास सोडणार आहेत. उपवास केल्यानंतर उपवास सोडताना योग्य आहार घेणे घरजेचे आहे. दरम्यान त्यासाठी उपवास सोडण्यासाठी काय पदार्थ बनवायचा प्रश्न पडला असेल तर बनवा अननसाचा हलवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अननसाचा हलवा साहित्य :

  • २ वाट्या अननस तुकडे बारीक चिरून
  • १ वाटी खवा
  • १ वाटी साखर
  • ४-५ चेरी चिरून
  • २ चमचे तूप.

अननसाचा हलवा कृती:

  • अननस चिरून हलक्या हाताने पिळून घ्यावा.
  • नंतर त्यात साखर मिसळावी आणि कढईत तूप टाकून त्यावर ते मिश्रण परतावे.
  • १० ते १२ मिनिटे परतावे. मंद आचेवर कोरडेसर होऊ द्यावे.
  • मग त्यात खवा हाताने कुसकरुन घालावा. पुन्हा ४-५ मिनिटे परतावे.
  • गाजर हलव्याप्रमाणे मोकळे होऊ द्यावे, मग गॅसवरुन उतरवावे.

हेही वाचा >> “चटपटीत खानदेशी कढी” कमी साहित्याची महाराष्ट्रीयन दही कढी नक्की ट्राय करा…

  • वरून चिरलेल्या चेरीज टाकाव्यात.
  • उपासासाठी एक वेगळी स्विट डिश म्हणून करता येईल.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tasty and healthy pineapple halwa recipe in marathi navratri 2023 fasting upvas recipe srk
Show comments