Cutlets: रविवारी अनेकांच्या घरी पोहे, उपमा, इडली बनवली जाते. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही वाटाणा-पोह्याचे चमचमीत कटलेट बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया वाटाणा-पोह्याच्या कटलेटची सोप्पी रेसिपी

वाटाणा-पोह्याचे कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. २ कप पोहे (भिजवलेले)
२. १/२ कप हिरवा वाटाणा उकडलेला
३. ३ उकडून कुस्करलेले बटाटे
४. २ कांदा बारीक चिरलेला
५. १ चमचा लाल मिरची पावडर
६. १ चमचा गरम मसाला पावडर
७. १ चमचा काळी मिरी पावडर
८. १ चमचा जिरे
९. १ चमचा चाट मसाला
१०. १ चमचा बारीक चिरलेली मिरची
११. २ चमचे गाजराचा किस
१२. २-३ चमचे कॉर्नफ्लॉवर
१३. कोथिंबीर
१४. तळण्यासाठी तेल
१५. चवीसाठी मीठ

paneer popcorn recipe
Paneer Popcorn Recipe: पनीर लव्हर्स, ‘ही’ नवीकोरी रेसिपी लगेच करा ट्राय! एकदा खाल, तर पॉपकॉर्नची खरी चव विसराल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Korean Maggie Recipe
एक मॅगीचं पॅकेट आणा आणि झटपट बनवा कोरिअन स्टाईल मॅगी, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Bread Pizza Toast Recipe
नाश्त्यासाठी ट्राय करा ‘ब्रेड पिझ्झा टोस्ट’ रेसिपी, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती
Nutritious ragi cutlets recipe
फक्त ३० मिनिटांत बनवा नाचणीचे पौष्टिक कटलेट; वाचा साहित्य आणि कृती

वाटाणा-पोह्याचे कटलेट बनवण्याची कृती:

१. सर्वात प्रथम भिजवलेले पोहे हाताने कुस्करुन घ्या.

२. आता त्यात हिरवा वाटाणा, बटाटा, कांदा, कोथिंबीर, लाल मिरची, गरम मसाला, काळी मिरी पावडर, जीरे आणि चाट मसाला, गाजराचा किस हे सर्व साहित्य टाकून सर्व मिश्रण एकजीव करा.

३. आता हातावर तेल हे लावून हे या मिश्रणाचे कटलेट थापा.

४. त्यानंतर एका गरम कढईत हे कटलेट लालसर होऊपर्यंत तळून घ्या.

हेही वाचा: १५ मिनिटांत झटपट बनवा ‘गोड लापशी’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

५. तयार गरमागरम टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

Story img Loader