Bhindi masala : रोज काय भाज्या करायच्या हा नेहमीचाच प्रश्न आहे. त्यात हिरव्या भाज्या म्हंटलं की पौष्टिक असूनही अनेकांचा पालेभाजीला नकार असतो. भेंडीची भाजी म्हंटलं की अनेकजण नाक मुरडतात. भेंडी ही काहींच्या खूप आवडीची असते तर काहींना अजिबात आवडत नाही. भेंडीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असते अनेक गुणधर्म असतात. मात्र काहींना भेंडीचा चिकटपणा आवडत नाही. मात्र आज ही भेंडीची रेसिपी ज्यांना भेंडी आवडत त्यांनाही नक्की आवडेल. ही भरलेली भेंडीची रेसिपी क्रिस्पी कुरकुरीत आणि आपल्या साध्या भेंडीपेक्षा एकदम टेस्टी लागते.
भरलेली भेंडी साहित्य-
1 किलो भेंडी, तेल 1 लिटर, धने 50 ग्रॅम, जिरे 50 ग्रॅम, तीळ 100 ग्रॅम, सुके खोबरे 100 ग्रॅम, नारळ 1, आलं 50 ग्रॅम, बेसन अर्धा किलो, गूळ पाव किलो, चिंच 100 ग्रॅम, तिखट 100 ग्रॅम, चवीपुरते मीठ, कोथिंबीर अर्धी जुडी
भरलेली भेंडी कृती –
भेंडीचे दोन ते अडीच इंचाचे तुकडे त्याच्या एका बाजूने उभा छेद द्या. धणे, जिरे, किळ, सुके खोबरे, नारळ, आलं, लसूण बारीक वाटून घ्यावे. १०० ग्रॅम चिंच पाण्यात भिजत घालून त्याचा कोळ काढून घ्यावा. त्यामध्ये गूळ घालावा. चिंच गुळाच्या पाण्यात वरील बारीक मसाला मिसळून बेसन पीठ, तिखट, मीठ, कोथिंबीर घालून त्याचे सारण एकजीव करुन ती भेंडीमध्ये भरुन भेंडी तेलात तळून घ्यावी. ही फ्राय भेंडी चवीला अत्यंत चांगली लागते.
हेही वाचा – १० मिनिटांत करा हॉटेलसारखा रंगीत पुलाव; नोट करा ही स्पेशल रेसिपी
भेंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कसे कमी होते?
भेंडीमध्ये असणाऱ्या पेक्टिन एन्झाइममुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच आवश्यक आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाचे आरोग्य सुरक्षित होते. भेंडीमुळे कॅन्सरचा धोका कमी होतो तसेच हे अॅनिमियाला सुद्धा प्रतिबंधित करते. भेंडीचे चिकटपणामुळे यकृतातील विषारी पदार्थ व पित्त/आम्ल बाहेर पडते.
तर तर आजच ट्राय करुन पाहा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला नक्की कळवा.