Fish Cutlet Recipe: फिश फ्राय, फिश करी, फिश मसाला आपण नेहमीच आवडीने खातो. पण, नवनवीन रेसिपी ट्राय करायला सर्वांनाच आवडतं. अशा वेळी तुम्ही फिश कटलेटची सोपी आणि टेस्टी रेसिपी आवर्जून ट्राय करा. ही रेसिपी बनवायला सोपी आणि पटकन होणारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिश कटलेटसाठी लागणारे साहित्य:

१. फिश कटलेटसाठी सुरमई
२. ३-४ चिरलेल्या मिरच्या
३. २ कांदे बारीक चिरलेले
४. २ चमचे लिंबाचा रस
५. १/२ चमचा हळद
६. १/२ चमचा गरम मसाला
७. २ पावाचे तुकडे
८. ब्रेडचा चुरा
९. आलं-लसूण पेस्ट
१०. अंडे फेसलेले
११. मीठ चवीनुसार
१२. तेल आवश्यकतेनुसार
१३. कोथिंबीर

फिश कटलेट बनविण्याची कृती:

हेही वाचा: झटपट होणारी ‘अंडा नूडल्स’ची सोपी रेसिपी; नोट करा साहित्य आणि कृती

१. सर्वांत आधी सुरमईचे तुकडे उकडून, त्याची कातडी व त्यातील काटे काढून घ्यावे.

२. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा, चिरलेली मिरची, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, पावाचे तुकडे, हळद, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि त्याचे गोळे करावेत.

३. आता तयार फिश कटलेटचे गोळे फेसलेल्या अंड्यात बुडवून, त्यानंतर त्यावर ब्रेडचा चुरा लावून घ्या.

४. त्यानंतर गरम कढईत तेल ओतून, त्यात हे गोळे खरपूस तळून घ्या.

५. तयार गरमागरम फिश कटलेट तिखट चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Testy fish cutlet recipe immediately note down the materials and actions sap
Show comments