Testy gajar barfi recipe: सणासुदीच्या दिवसात कामाला जाणाऱ्या महिलांना प्रत्येक वेळी पुरण पोळी बनण्यासाठी वेळ नसतो. येत्या काही दिवसात होळी, गुढीपाडवा हे सण साजरे केले जातील. अशावेळी तुम्ही नैवेद्यासाठी कोणताही एक गोड पदार्थ कमी वेळेत नक्कीच बनवू शकता. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी खास गाजराची पौष्टिक बर्फी घेऊन आलो आहोत. ही बर्फी चवीष्ट आणि तितकीच आरोग्यदायीही आहे.
गाजराची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- ७-८ गाजर
- २ वाटी साखर
- २ वाटी दूध
- २ वाटी रवा
- २ वाटी मिल्क पावडर
- २ चमचे वेलची पूड
- १ वाटी ड्रायफ्रुट्स
- तूप आवश्यकतेनुसार
गाजराची बर्फी बनवण्याची कृती:
- सर्वप्रथम गाजरची साल ते काढून स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर गाजर किसून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- आता एका कढईत तूप न वापरता रवा मंद आचेवर खमंग सुगंध येईपर्यंत भाजा.
- आता भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून कढईत ४ चमचे तूप घालून किसलेले गाजर घाला.
- १० मिनिटांपर्यंत वाफ येई पर्यत परतल्यानंतर त्यात दूध घालून आटेपर्यंत शिजु द्या. त्यानंतर यामध्ये साखर घाला.
- साखर विरघळली की त्यामध्ये रवा, मिल्क पावडर घालून मिक्स करा.
नंतर झाकण ठेवून मंद आचेवर ठेवून शिजवून घ्या. - त्यावर शेवटी वेलची पूड घालून एका मोठ्या ताटात तूप लावा तयार केलेलं मिश्रण घाला.
- तयार केलेल्या मिश्रणावर सुक्या ड्रायफ्रुट्सचे काप पसरवा आणि नंतर थंड झाल्यावर त्या मिश्रणाला बर्फीचा आकार देऊन त्यांचा आस्वाद घ्या.