महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती पंरपरा आणि विविध खाद्यपदार्थांनी समृद्ध आहे. हे पारंपारिक पदार्थ आजही बनवले जातात आणि तितक्याच आवडीने खाल्ले जातात. अशा एक पदार्थ आहे लाटी वडी. हा पदार्थ सांगली आणि साताऱ्यात प्रसिद्ध आहे. तुम्हाला भाकरवडी खायला आवडते का? आवडत असेल तर तुम्हाला ही खास रेसिपी नक्की आवडेल. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी
लाटी वडीसाठी साहित्य
लाटी वडीच्या पातीसाठी पीठसाठी
लाटी वडी
एक वाटी गव्हाचे पीठ
एक वाटी बेसन पीठ
अर्धा ते पाव चमचा हळद
एक चमचा चिली फ्लेक्स
चवीनुसार मीठ
दोन चमचे मोहन तेल
हेही वाचा – झणझणीत बटाट्याचा ठेचा! एकदा खाऊन तर पाहा, झटपट लिहून घ्या रेसिपी
लाटी वडीचे सारणासाठी साहित्य
भाजलेले पाव वाटी तीळ
भाजलेले पाव वाटी कारळे (काळे तीळ)
अर्धी वाटी सुक्या खोबर्याचा किस
अर्धी वाटी शेंगदाण्याचा कुट
अर्धा चमचा हळद
एक चमचा लाल तिखट
अर्धा चमचा जिरे पावडर
अर्धा चमचा आले लसून पेस्ट
चवीनुसार मीठ
इतर साहित्य
खसखस
तळण्यासाटी तेल
लाटी वडी तयार करण्याची कृती
लाटी वडीच्या पातीसाठी पीठ कसे मळावे?
प्रथम एका भांड्यात एक वाटी गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ घ्यावे. त्यात अर्धा ते पाव चमचा हळद एक चमचा चिली फ्लेक्स टाका, चवीनुसार मीठ टाकून मिश्रण एकत्र करा. त्यात दोन चमचे मोहन तेल टाकून मिश्रण एकजीव करा. थोडे थोडे पाणी टाकून व्यवस्थित मळून घ्यावे. मध्यम स्वरुपात मीठ मळून घ्यावे.
लाटी वडीचे सारण कसे बनवावे?
गॅसवर कढई गरम करून त्यात पाव वाटी तीळ आणि कारळे टाकून खरपूस भाजून घ्यावे. त्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. आता त्यात अर्धी वाटी सुक्या खोबर्याचा किस टाका आणि पुन्हा वाटून घ्यावे. आता यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कुट टाका. आता यात अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.
हेही वाचा – एकदा अख्खा मसूर बिर्याणी खाऊन पाहा, चिकन किंवा मटण बिर्याणी विसरून जाल! झटपट लिहून घ्या सोपी रेसिपी
लाटी वडी कशी बनवायची
लाटी वडीच्या पातीसाठी पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे. त्याचा एक गोळा करा आणि गोलाकार आणि पातळ लाटून घ्यावे. त्यावर थोडी खसखस टाकून हलक्या हाताने लाटणे फिरवा. खसखस टाकलेली पाती पलटून दुसऱ्या बाजूने हलक्या हाताने लाटा. आता त्यावर तयार सारण सर्वत्र पसरवून घ्यावे आणि हलक्या हाताने दाब द्यावा. आता एका बाजूने पाती गुंडाळून घ्यावे आणि गुंडाळताना हलक्या हाताने दाबावे. आता त्याते काप करून घ्यावे.
एका भांड्यात पाणी तापवायला ठेवा आणि त्यावर चाळण ठेवा.चाळणीला तेल लावून त्यात लाटी वडी वाफवण्यासाठी ठेवा. मध्यम आचेवर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ येऊ द्या. चांगली वाफ आली की लाटी वडी काढून घ्यावे.
गॅसवर तेल तापायला ठेवा आणि त्यात लाटी वड्या टाकून व्यवस्थित तळून घ्यावे. सोनेरी रंग आल्यानंतर लाटीवड्या काढून घ्यावे.
हेही वाचा – पितृपक्षात बनवा खमंग थापीववडी! झटपट नोट करा पातवडीची अत्यंत सोपी रेसिपी
सातारा सांगलीमध्ये प्रसिद्ध लाटीवड्या तयार आहे. गरम गरम खा. या वड्या हवा बंद डब्यात ठेवल्या एक-दोन आठवडे टिकतात.