Potato tasty puri recipe: बटाटा वडा, बटाट्याचा पराठा, बटाटा लॉलीपॉप असे बटाट्यापासून बनवलेले अनेक पदार्थ तुम्ही आजपर्यंत नक्कीच ट्राय केले असतील. पण,आज आम्ही तुम्हाला बटाट्याची पुरी कशी बनवायची हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया बटाट्याची चविष्ट पुरी…
बटाट्याची पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ बटाटे (उकडलेले)
- २ वाटी तांदळाचे पीठ
- १ चमचा गरम मसाला
- २ चमचेमिरची पावडर
- १/२ चमचा हळद
- १ चमचा आलं-लसूण पेस्ट
- ३ चमचे कसुरी मेथी
- १/४ चमचा ओवा
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
बटाट्याची पुरी बनवण्याची कृती:
- सर्वप्रथम, एका भांड्यात उकडलेले बटाटे किसून घ्या. त्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ, गरम मसाला, टीस्पून मिरची पावड आणि हळद, कसुरी मेथी, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ घाला.
- हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून त्याममध्ये कोमट पाणी घालून पीठ मळून घ्या.
- आता एका गोळ्याच्या आकाराचे पीठ घेऊन पुरी लाटून घ्या आणि मध्यम आचेवर गरम तेलात तळून घ्या.
- दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत तळून घ्या.
- अशाप्रकारे कुरकुरीत बटाट्याची पुरी खाण्यासाठी तयार आहे.