बिर्याणी म्हटलं तरी अनेकांच्या जीभेला पाणी सुटते. तुम्ही चिकन किंवा मटण बिर्याणी नेहमीच खाता पण तुम्ही कधी अख्खा मसूर बिर्याणी खाल्ली आहे का? नसेल तर ही रेसिपी एकदा बनवून पाहा. एकदा तुम्ही आख्खा मसूर बिर्याणी खाल्ली तर तुम्ही चिकन किंवा मटण बिर्याणी विसरून जाल कारण त्याची चवच इतकी अप्रतिम आहे. झणझणीत आणि तयार करण्यास सोपी अशी बिर्याणी तुम्ही कधीही बनवू शकता. तुम्हाला नेहमीचा डाळ भात किंवा खिचडी भात खाऊन वैतागला असाल तर ही मसूर बिर्याणी नक्की खाऊन पाहा तुमचे पोट भरेल पण मन भरणार नाही. तुम्हाला बिर्याणी खायला आवडते का? मग तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. नोट करा ही सोपी रेसिपी
मसूर बिर्याणी रेसिपी
मसूर बिर्याणीसाठी लागणारे साहित्य
एक तास भिजवलेले अख्खे मसूर/
तेल
तेजपत्ता
खडे मसाले
कांदा
आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट
तिखट मसाला
गरम मसाला
दही
तळलेला कांदा
टोमॅटोची पेस्ट
मीठ
पाणी
फ्राईड बटाटा
कोथिंबीर
पुदिना
बासमती तांदूळ
तूप
हेही वाचा – झणझणीत बटाट्याचा ठेचा! एकदा खाऊन तर पाहा, झटपट लिहून घ्या रेसिपी
मसूर बिर्याणी रेसिपीची कृती
- एका भांड्यात तेल, तेज पत्ता, खडे मसाले, कांदा आणि आलं, लसुन आणि हिरवी मिरची परता.
- त्यानंतर लाल तिखट घालून एकत्र करून मग गरम मसाला टाकून चांगले परतून घ्या,
- आता त्यात दही टाकून एकत्र करा आणि मग तळलेला कांदा घाला आणि एकजीव करून घ्या
- आता त्यात टोमॅटोची प्युरी टाका आणि नंतर भिजवलेले मसूर घाला आणि एकत्र करा. त्यात मीठ आणि पाणी घालून पाच मिनिट शिजवून घ्या. त्यात फ्राईड केलेले बटाटे घालून मिक्स करून घ्या.
- कोथिंबीर आणि पुदिना घालून परत पाच मिनिटे शिजवून घ्या
- त्यानंतर शिजवलेले बासमती तांदूळ घालून वरून पुदिना, तळलेला कांदा आणि लिंबूचा रस घालून वाफेवर दहा मिनिटं ठेवून द्यायचं.
- एकदा वाफ आली की त्यावप साजूक तूप घालून गरमा गराम वाढा.
हेही वाचा – लाडक्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा स्वादिष्ट वाटली डाळ! लिहून घ्या रेसिपी
कोशिंबरी, लोणचं आणि पापडबरोबर ही बिर्याणी खाण्याची मज्जा काही वेगळी आहे. एकदा खाऊन तर बघा. इंस्टाग्रामव sadhanas__recipes_04 नावाच्या पेजवर या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे.