Balushahi Recipe: दिवाळीच्या दिवसात विविध पदार्थ बनवले जातात. पण, जर तुम्हाला यंदा कोणताच पदार्थ बनवायला वेळ मिळाला नसेल तर किमान ही बालूशाहीची सोपी रेसिपी तरी नक्की ट्राय करा. जाणून घ्या साहित्य आणि कृती
बालूशाही बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- १ कप मैदा
- १/२ चमचा खाण्याचा सोडा
- २ चमचे तूप
- ३ चमचे दही
- १ कप साखरेचा अर्धा कप पाक
- ४ कप तूप
- मीठ
बालूशाही बनवण्याची कृती:
हेही वाचा: झटपट बनवा चविष्ट अन् पौष्टिक पालक पाऱ्या; वाचा परफेक्ट रेसिपी
- सर्वप्रथम साखरेत, साखर भिजेल इतके पाणी घालून ते पाक तयार करून घ्या.
- त्यानंतर मैद्यात मीठ, तूप आणि दही घालून मिक्स करून त्याचा गोळा तयार करा. हे पीठ मळताना पाणी लागल्यास केवळ एक चमचा पाणी वापरा.
- आता २०-३० मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा.
- त्यानंतर कढईत तूप घालून मंद गॅसवर तापायला ठेवा.
- आता मुरलेल्या गोळ्यातून पेढ्याच्या आकाराच्या बालूशाही तयार करा.
बालूशाहीचा आकार देताना त्यामध्ये अंगठ्याने दाब द्या आणि हे गरम तुपात घालून मंद आचेवर तळून घ्या. - लालसर रंग येईपर्यंत या बालूशाही तळून त्या थंड करायला ठेवा.
- या थंड झालेल्या बालूशाही साखरेच्या पाकात किमान एक तास तरी ठेवा, त्यानंतर या पाकातून बाहेर काढून त्याचा आस्वाद घ्या.