शेफ नीलेश लिमये

साहित्य

*  साहित्य – एक हिरवी सिमला मिरची, एक लाल सिमला मिरची, एक पिवळी सिमला मिरची, लाल कोबी, मीठ, मिरपूड चवीनुसार, १ चमचा चिल्ली फ्लेक्स, २ चमचे व्हिनेगर, १चमचा ऑलिव्ह ऑइल.

कृती :

सिमला मिरच्या नीट स्वच्छ धुऊन घ्या. त्यावर थोडेसे तेल लावून ओव्हनमध्ये मिरच्या स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यावर थोडेसे तेल लावून ओव्हनमध्ये २०० वर १० मिनिटे भाजून घ्यावी. किंवा गॅसवर वांगे भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्यावी. आता भाजलेल्या सिमला मिरचीचे लांबट पातळ तुकडे करून घ्यावेत. यात व्हिनेगर, मीठ, मिरपूड आणि चिली फ्लेक्स घालावे. एका सर्व्हिंग प्लॅटरवर कोबीची पाने तोडून त्यावर मिरचीचे हे सॅलड सजवावे. थंडगार सव्‍‌र्ह करावे.