Soybean Parathas Recipe : मुलांचा शाळेचा डब्बा असो किंवा ऑफिसचा डब्बा असो, रोज रोज नवीन काय डब्यात द्यायचं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? काळजी करू नका. मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी सोया पराठाची रेसिपी जाणून घ्या.

सोयाबीन हे अत्यंत पोष्टिक आहेत पण मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सोयाबीन खायला आवडत नाही म्हणूनच तुम्ही त्याचा स्वादिष्ट पराठा बनवून खायला घालू शकता. मोठ्यांपासून छोट्यापर्यंत सर्वांना हा पदार्थ आवडेल. विशेष म्हणजे ही रेसिपी तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही. फक्त १५ मिनिटांत हा पदार्थ तयार करता येतो. तुम्ही रात्रीच तयारी करून ठेवली तर तुमचा आणखी वेळ वाचू शकतो.

चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी.

सोया पराठा

सोया वडी / सोया चंक्स १ कप
बारीक चिरलेला कांदा १ मध्यम
तेल २ चमचे
जिरे अर्धा चमचा
आले लसूण पेस्ट १ चमचा
हळद अर्धा चमचा
मिरची पावडर २ चमचे
गरम मसाला २ चमचे
धने पूड १ चमचा
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर

कणकेसाठी
गव्हाचे पीठ अर्धा कप
मीठ चवीनुसार
तेल गरजेप्रमाणे

कृती

प्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सोयाबीन चंक्स शिजवून घ्यावा.

थंड पाण्याने धुवून घ्या आणि त्यातील पाणी हाताने पिळून घ्या.

आता मिक्सरमध्ये शिजवलेले सोया फिरवून घ्या आणि बारीक घ्या.

आता कढईमध्ये तेल गरम करा आणि त्यात तेल जिरे, मोहरी, कडीपत्ता टाका आणि चांगले परतून घ्या.

आता त्यात कांदा, टोमॅटो टाकून चांगले परता. त्यात आले लसूण पेस्ट टाकून परता.

त्यात गरम मसाला, हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धने पूड, चवीनुसार मीठ टाका आणि चांगले परतून घ्या.

आता त्यात बारीक केलेले सोया टाका आणि एकत्र करून घ्या. आता त्या कोथिंबीर टाकून छान परता.

आता गव्हाच्या पीठाची कणिक मळून घ्या. पोळी लाटण्यासाठी करतात तसा गोळा करा आणि त्यात तयार सोयाची भाजी भरून तोंड बंद करा आणि गोल पराठा लाटा.

तव्यावर पराठा भाजून घ्या. त्यावर तूप लावू शकता. हा पराठा दही किंवा सॉस बरोबर मुलांना खायला द्या. मुलांना हा पराठा नक्की आवडेल.

ऑफिसच्या डब्यासाठी देखील हा चांगला पर्याय आहे.