“Kids’ Favorite Snack: सकाळाच्या नाश्तासाठी काय करावे हा प्रश्न रोज प्रत्येक गृहिणींना पडतो. विशेषत: जेव्हा सकाळी मुलांच्या शाळेच्या किंवा तुमच्या ऑफिसच्या डब्यासाठी काय बनवावे सुचत नाही. रोज रोज तेच तेच पोहे उपीट खाऊन सर्वांना कंटाळा आलेला असतो. नाश्त्यासाठी काहीतरी झटपट करता येईल आणि चविष्ट असेल असा पदार्थ करायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे.
कच्चा बटाटा आणि गव्हाच्या पिठाचा हा कुरकुरीत नाश्ता तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. लहानंपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्की आवडेल हा पदार्थ. चला तर मग जाणून घेऊ या.
कच्चा बटाटा अन् गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत नाश्ता
साहित्य
- गव्हाचे पीठ – दीड वाटी
- रवा – दोन ते तीन चमचा
- अर्धा चमचा – मीठ
- अर्धा चमचा – ओवा
- बटाटा – तीन
- चिरलेला कांदा – १
- चिरलेला कोबी – अर्धा वाट
- आल लसून पेस्ट – पाव चमचा
- हिरवी मिरची – एक
- गरम मसाला – अर्धा चमचा
- चाट मसाला – अर्धा चमचा
- धणे -जिरे पूड – अर्धा चमचा
- आमचूर पावडर – अर्धा चमचा
- मल्टी ग्रेन आटा किंवा थालपीठाचे पीठ – अर्धा चमचा
कृती
- प्रथम एका भांड्यात दीड वाटी गव्हाचे पीठ न चाळता घ्या. कारण त्यातील कोंड्यामध्ये फायबर्स असतात. आता त्यात दोन ते तीन चमचा
रवा, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा ओवा, एक कप पाणी घालून घट्ट कणीक मळून घ्या. पाच मिनीटे पीठ बाजूला ठेवा - आता ३ बटाट्याची साल काढून किसून घ्या. पाण्याने बटाट्याचा किस धूवून घ्या. बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा आले लसून पेस्ट, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धणे-जिरे पूड, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा मल्टी ग्रेन आटा किंवा थालपीठाची भाजणीचे पीठ टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या.
- आता गव्हाची पीठ पुन्हा मळून त्याच पोळीसाठी गोळे करतो तसे गोळे करा. आता एक पोळी लाटून घ्या. आता त्यावर तयार मिश्रण पसरवा. चपाती एका बाजूने गुंडाळा आणि हाताने दाबून चपटी करा. अशाच पद्धतीने रोल करून त्याचे तोडं दोन्ही बाजूने बंद करा.
- आता एका भांड्यात पाणी उकळून घ्या. आणि त्यावर हे रोल ठेवून वाफवून घ्या. १० मिनिटांनी गॅस बंद करा. चाळण खाली काढून ते थंड करा.
- एका भांड्यात दोन चमचे गव्हाचे पीठ, चिमुटभर मीठ आणि अर्धा कप पाणी घालून दुधापेक्षा घट्ट मिश्रण तयार करा.
- वाफवलेले रोल तुम्ही मोमोज सारखे खाऊ शका. तुम्हाला कुरकुरीतपणा हवा असेल तर तयार मिश्रणात घोळून घ्या आणि तेलात तळून घ्या.
- डब्यासाठी कुरकुरीत नाश्ता तयार आहे.
युट्यूबवर @Cookingticketmarathi पेजवर ही रेसिपी व्हिडीओ शेअर केला आहे.