Breakfast Special Tiffin : मुलांच्या डब्यासाठी काय बनवावे असा प्रश्न तुम्हालाही रोज पडत असेल. आज काल मुलांच्या शाळेत छोटी सुट्टी होते ज्यामध्ये हलका फुलका नाश्ता करता येईल आणि मोठी सुट्टी होते ज्यामध्ये मुलांना जेवण करता येईल. मुलांची भूक आणि वाढत्या वयातील आहाराची गरज लक्षात घेऊन हा बदल जवळपास सर्वच शाळांमध्ये केला जातो. मोठ्या सुट्टीसाठी तर भाजी पोळीच देतात पण छोट्या सुट्टीमध्ये काहीतरी चविष्ट आणि पटकन खाता येईल असा पर्याय हवा असतो. अशा सुट्टीसाठी तुम्ही टोमॅटो भात बनवू शकता. छोट्या सुट्टीमध्ये हा पटकन खाता देखील येईल आणि हा भात चवीला देखील अत्यंत चविष्ट असतो. एवढंच नाही तर हा भात बनवयाला देखील अत्यंत सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊ या टोमॅटो भाताची रेसिपी
टोमॅटो राईस रेसिपी | टोमॅटो भात रेसिपी | Tomato Rice Recipe | Tomato Bhat Recipe
साहित्य
तांदूळ (बासमती तुकडा) १ कप
तेल २ चमचे
दालचिनी २
तमालपत्र १
मोहरी १/४ चमचा
जिरे १ चमचा
उभी चिरलेली हिरवी मिरची २
उभा कापलेले टोमॅटो ३ मध्यम
आले लसूण पेस्ट १ चमचा
हळद १/२ चमचा
मिरची पावडर १ चमचा
धने पूड १/२ चमचा
जिरे पूड १/२ चमचा
गरम मसाला १/२ चमचा
हिंग
मीठ चवीनुसार
पाणी २ कप
कोथिंबीर
तूप २ चमचे
कृती
कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे तमालपत्र टाकून चांगले परतून घ्या. त्यात चिरलेली मिरची टाकून परतून घ्या.
आता त्यात कांदा टाकून चांगले परतून घ्या.
आता टोमॅटो टाकून चांगले परतून घ्या. हवे असेल्यास टोमॅटोची पेस्ट करून टाकू शकता.
त्यात आले लसून पेस्ट टाकून चांगले परतून घ्या.
आता त्यात हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धने पूड, चवीनुसार मीठ टाकून परतून घ्या. त्यात धूवून घेतलेला तांदूळ टाका सर्व एकत्र करून घ्यात. त्यावर चिरलेली कोथिंबीर आण गरजेनुसार पाणी टाका.
कुकरचे झाकण लावून तीन शिट्या द्या. टोमॅटो भात तयार आहे.