मुलांना रोज डब्यांत पौष्टिक आणि हेल्दी असे काय द्यावे असा प्रश्न सगळ्याच आयांना पडतो. सतत विकतचे काही ना काही किंवा बिस्कीटे देणे हा मुलांचे पोषण होण्यासाठी तितका चांगला पर्याय नाही. त्यामुळे त्यांना आवडेल आणि पोषकही होईल असा सकाळचा सोपा आणि पौष्टिक नाश्ता रेसिपी पाहूयात. ही रेसिपी मुलं आवडीनं खातील आणि आरोग्यासाठी तो पदार्थ पौष्टिकही असेल.
हेल्दी ब्रेकफास्ट साहित्य
- १ छोटी वाटी मूग डाळ
- १ छोटी वाटी चणाडाळ
- १ छोटी वाटी तांदूळ
- ४ काळी मिरी
- २ लवंगा
- १ छोटा दालचिनीचा तुकडा
- १/२ चमचा जीरे
- १ चमचा धने
- १/४ चमचा ओवा
- १० कढीपत्त्याची पाने
- १/४ चमचा हिंग
- १ समजा शेंगदाण्याचा जाडसर कूट
- १ टेबलस्पून साजूक तूप
- १ सुकी मिरची
हेल्दी ब्रेकफास्ट कृती
प्रथम तांदूळ चना डाळ आणि मूग वेगवेगळे, मंद आचेवर हलके होईपर्यंत कोरडे भाजून घ्यावेत.
नंतर त्यामध्येच धने,जिरं,लवंगा, काळी मिरी, दालचिनी आणि एक सुकी मिरची हे टाकून दोन मिनिटं परतून घेऊन थंड करायला ठेवणे. व नंतर मिक्सरला लावून जाडसर भरडा करून घेणे.
नंतर कढईत साजूक तूप फोडणीसाठी घेऊन त्यात कढीपत्ता आणि हिंग घालून आपण केलेला भरडा छोटी दीड वाटी घालून परतून घ्यावे. त्यानंतर चार वाट्या पाणी घालून गरजेनुसार मीठ, साखर मंद आचेवर पाच मिनिटं झाकून ठेवावे.
नंतर त्यात एक चमचा शेंगदाण्याचा कूट, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट परतून गरमागरम सर्व्ह करावे.
वरून एक चमचा साजूक तूप सोडावे.अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता तयार आहे.