Corn Cutlet Recipe: शाळेत जाणाऱ्या मुलांना दररोज पोळी-भाजी दिली की, ते खाताना मुलं नाक-तोंड मुरडतात. अनेकदा दिलेला पूर्ण डबा तशाच तसा मागे येतो. अशा वेळी तुम्ही अधूनमधून मुलांच्या डब्यामध्ये त्यांना आवडतील असे पदार्थ नक्कीच देऊ शकता. आज आम्ही अशीच एक नवीन रेसिपी सांगणार आहोत, जी मुलं आवडीनं खातील आणि आरोग्यासाठी तो पदार्थ पौष्टिकही असेल.
मक्याचे कटलेट बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
- १ गाजर
- १ बीट
- १ मका
- १ वाटी रवा
- १ चमचा जिरे
- २-३ हिरव्या मिरच्या
- एक आल्याचा तुकडा
- पाव चमचा हळद
- १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
मक्याचे कटलेट बनवण्याची कृती :
- सर्वप्रथम गाजर, बीट आणि मका उकडून घ्या.
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात उकडलेल्या मिश्रणासह त्यात मिरच्या आणि आलं टाकून वाटून घ्या.
- आता या वाटून घेतलेल्या मिश्रणात रवा, जिरे, हळद, मीठ, कोथिंबीर टाका आणि मग ते सर्व मिश्रण एकजीव करा.
- आता कटलेटच्या आकाराचे गोळे बनवून, ते सुक्या रव्यामध्ये घोळवून घ्या.
- आता तवा गरम करा. मग त्यावर थोडं तेल ओता आणि त्यात मक्याचे कटलेट तळून घ्या.
- तयार मक्याचे कटलेट मुलांच्या डब्यामध्ये सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर भरून द्या.