बऱ्याच वेळा काही चटपटीत खायची चव येते. अशावेळी कोणता पदार्थ बनवावा असा प्रश्न अनेक गृहीणींना पडतो. मात्र झटपट तयार होणाऱ्या आणि पौष्टिक पदार्थांची नेमकी यादी अशावेळी लक्षात येत नाही. यावेळी तुम्ही हे उकडीचे शेंगुळे बनवू शकता. तुम्ही आतापर्यंत गोड जिलेबी खाल्ली असेल, आज आम्ही तुम्हाला तिखट जिलेबी कशी करायची हे दाखवणार आहोत.

साहित्य –

Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
teacher student sweet joke
हास्यतरंग :  मिठाई…
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Vidarbha special tondlichi masala bhaji recipe in marathi eating pointed gourd is good for health
विदर्भ स्पेशल तोंडलीची भाजी; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी
  • गहू, ज्वारी, तांदूळ, बेसण, नाचणीचे पीठ – प्रत्येकी १ वाटी
  • उडदाचे पीठ – अर्धी वाटी
  • हिरव्या मिरचीचा ठेचा – आवश्यकतेनुसार
  • आलं-लसूण-जिरे पेस्ट – आवश्यकतेनुसार
  • शेंगतेल – २ चमचे
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – आवश्यकतेनुसार

कृती –

  • सुरुवातील वरील सर्व पीठे एकत्र करुन घ्या. यात दोन चमचे शेंगतेल टाका. नंतर या मिश्रणात आवश्यकतेनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा, आलं-लसूण-जिऱ्याची पेस्ट टाका.
  • याशिवाय यात चिरलेली बारिक कोथिंबीर, हळद, आणि मीठ घालून हे मिश्रण पाण्याने सैलसर मळून घ्या.
  • मळलेल्या पीठाचा गोळा काही काळासाठी भिजत ठेवा. यानंतर या पीठाच्या लाटोळ्या करुन घ्या. लाटोळ्या (वर फोटो दाखवल्याप्रमाणे हाताने छोट्या छोट्या लांबलचक गोल लाटोळ्या तयार करुन घ्या.)
  • आता एका बाजूला पाणी उकळत ठेवा. उकळलेल्या पाण्यावर हलकेसे तेल लावून मोदक पात्राच्या चाळणीत ह्या लाटोळ्या ठेवा.

हेही वाचा >> Ganeshotsav २०२३: बाप्पाला आवडणारी गोड अननस-नारळ बर्फी कशी बनवावी पाहा; ही घ्या रेसिपी

  • दहा ते पंधरा मिनिटांनी हे उकडून तयार होईल. तुम्ही चहा किंवा कोणत्याही चटणीसोबत हे शेंगुळे खाऊ शकता.