Dough kneed tricks : चपाती गोल करणे म्हणजे तुम्हाला चांगला स्वयंपाक करता येतो किंवा तुम्ही सुगरण आहात असे मानले जाते. म्हणूनच प्रत्येक आई आपल्या आपल्या मुलींना गोल चपाती तयार करायला शिकवते. पण हे देखील खरं आहे की जेव्हा तुम्ही कणिक व्यवस्थित मळून घ्याल तेव्हाच चपाती मऊ आणि गोल बनते. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे. आज या लेखात आम्ही कणिक मळण्याच्या अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या चपाच्या मऊ, गोल, मऊ होतीलच पण त्याच बरोबर टम्म फुगतीलही. आता जास्त वेळ न वाया घालवता जाणून घेऊ या त्या ४ टिप्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कणिक मळण्याच्या टिप्स

कणिक मळताना कोमट पाणी वापरा. कोमट पाण्याने मळलेल्या कणकेच्या चपात्या गोल होतात आणि फुगलेल्या होतात. अशा प्रकारे पीठ मळून घेतल्यास चपात्या जास्त काळ मऊ राहतात आणि कडक होत नाहीत.

हेही वाचा – पावसाळ्यात महागले टोमॅटो, एकदाच खरेदी करून ‘या’ ३ पद्धतीने साठवा! जास्त दिवस राहू शकतात ताजे

तेल लावा

कित्येकदा कणि मळताना भांड्याला पीठ खूप चिकटते. ते चिकटू नये यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा कोरडे पीठ वापरत असाल त्याऐवजी आतापासून तुम्ही तेल वापरावे. पीठ चिकटायला लागल्यावर भांड्यात तेल लावा.

हेही वापरा – साबणाशिवाय भांडी कशी धुवावी? ही ट्रिक वापरून पाहा, आरश्यासारखे चमकतील भांडी

पनीरचे पाणी

याशिवाय मऊ कणिक मळण्यासाठी आणि फुगलेल्या चपात्यांसाठी बनवण्यासाठी किमान १० मिनिटे पीठ मळून घ्या. कणिक मळण्यासाठी तुम्ही पनीरचे पाणी देखील वापरू शकता. ही युक्ती देखील खूप चांगली आहे.

हेही वाचा – Kitchen Hacks: तुमचा कुकर पिवळा पडला आहे का? मग चुटकीसरशी होईल नवा! ‘असे’ करा साफ

दूध मिसळा

याशिवाय पीठ मळण्यासाठी दुधाचाही वापर करू शकता. मळण्यासाठी प्लेटमध्ये कोरडे पीठ काढल्यावर त्यात अर्धा कप दूध घाला. ही युक्ती पीठ मळण्यासाठी देखील चांगली मानली जाते.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips dough kneed tips how to knead dough faste for soft chapati or roti snk
Show comments