How To Make Proper Sandwich: : सँडविच बनवणे फक्त सोपेच नाही तर तुम्ही त्यासोबत अनेक प्रयोग करू शकता. मग ते पनीर सँडविच असो किंवा विदेशी पदार्थंपासून तयार केले असो….तुम्हाला हवे ते प्रयोग तुम्ही करू शकता. आपल्याला सँडविच तयार करणे कितीही सोपं वाटत असलं तरी ते बनवताना काही ना काही चूका करतो. त्यापैकी एक म्हणजे ब्रेड लवकर ओला होतो. सँडविचचा ब्रेड जर लवकर ओला झाला तर तेव्हा ते खाणे फार किचकट काम होऊन जाते. कधी सँडविचचे तुकडे पडतात तर कधी ओलसरपणामुळे खाताना तोंड आणि हात खराब होतो. तुमची ही समस्या सोडविण्यासाठी आण्ही काही टीप्स घेऊन आलो आहोत. आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टीप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्हाला सँडविच ओलं होणार नाही आणि दिर्घकाळापर्यंत फ्रेश राहू शकते.
सँडविचला ओलसर होण्यापासून कसे ठेवावे?
१. योग्य प्रकारचा ब्रेड वापरा
आपल्यापैकी बरेच जण सँडविच बनवण्यासाठी पांढरा किंवा ब्राऊन ब्रेड वापरतात. सँडविचसाठी जाड थर असलेला ब्रेड निवडणे सर्वोत्तम ठरेल. यामुळे तुमची ब्रेड लवकर ओलसर होणार नाही.
२. भरपूर चीज आणि मेयोनिज वापरा
हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल, परंतु ही टीप तुमचे सँडविच ओलसर होण्यापासून आणि तुकडे वाचवू शकते. चीज स्प्रेड किंवा मेयोनिज यांसारखे मसाले ब्रेड आणि फिलिंगमध्ये अडथळा म्हणून काम करतात. ब्रेड आणि फिलिंगचा थेट संपर्क टाळण्यासाठी मदत करतात आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. हे ब्रेडला ओलसर होणे टाळते आणि त्याचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.
३.भरपूर बटर लावा
जेव्हा सँडविचचा विचार केला जातो तेव्हा ते अधिक चांगले करण्यासाठी बटर लावणे आवश्यक आहे. चीज आणि मेओनिजप्रमाणे, बटर देखील ब्रेड आणि फिलिंगच्यामध्ये थेट संपर्क टाळतात. ब्रेड स्लाइसला चीज आणि मेओनिज लावण्यापूर्वी हळुवारपणे बटर लावा त्यामुळे सँडविचची देखील चव वाढते.
४. गरम पदार्थ घालू नका
आणखी एक गोष्ट जी तुम्ही टाळली पाहिजे ती म्हणजे तुमच्या सँडविचमध्ये अति गरम पदार्थ वापरू नका. असे केल्याने फिलिंगमध्ये अधिक ओलावा निर्माण होतो आणि सँडविच ओलसर होऊ शकते. हे टाळण्यासाठी, गरम पदार्थ खोलीच्या तपमानावर येऊ द्या आणि नंतर ते तुमच्या सँडविचमध्ये घाला.
५. ब्रेड भाजून घ्या
सँडविच बनवण्यापूर्वी ब्रेड भाजून घ्यायला विसरू नका. ब्रेड भाजल्याने ते केवळ कुरकुरीत होत नाही तर त्यातील ओलावा शोषण्याची क्षमता देखील कमी होते.भाजलेला ब्रेड ओलावा शोषून घेतो, परंतु ते प्रक्रिया न भाजलेल्या ब्रेडच्या तुलनेने हळू असते.
उरलेले सँडविच कसे साठवायचे?
बहुतेक लोकांना त्यांच्या उरलेल्या सँडविचचे काय करावे हे माहित नसते. सर्व प्रथम, आवश्यक तेवढेच सँडविच बनवा, तरीही काही शिल्लक राहिल्यास, त्यांना हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा आणि ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे चांगले.