साखरेच्या पाकातील खुसखुशीत जिलेबी खाण्याचा आनंद अतुलनीय आहे. ही मिठाई भारतात नेहमीच सर्वांना आवडते आहे. सण आणि उत्सवाच्यावेळी हीगी आवर्जून आणली जाते. हलवाईच्या दुकानात उपलब्ध असलेल्या जिलेबीची चव कमाल असते. त्या जिलेबीला नेहमी कुरकुरीतपणा आणि गोडपणा कसा कसा काय येतो? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना, जेव्हा आपण घरी जिलेबी बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नेहमीच काहीतरी चुकत असल्याचे दिसते. हवा तसा नारिंगी येत नाही किंवा ते हवा तसा कुरकुरीतपणा येत नाही. जर तुम्हाला घरच्या घरी हलवाई स्टाईल जिलेबी बनवण्याची कलेत प्राविण्य मिळवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

हलवाई स्टाइल जलेबी बनवण्याच्या टिप्स

१. चांगल्या दर्जाचा मैदा वापरा
जिलेबीमध्ये मैदा महत्त्वाचा घटक आहे जो चांगली रचना आणि आकार देतो. त्यामुळे पीठ तयार करताना उत्तम दर्जाचे पीठ वापरणे गरजेचे आहे. तुमच्या किचनमध्ये बराच वेळ पडून असलेले पीठ वापरणे टाळा

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या

२. तूप वापरा
पीठ तयार करताना तूप घालण्याचे महत्त्व दुर्लक्षित करू नका. त्यामुळे जिलेबीला वेगळी चव येते. तुपाचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले जाऊ शकते.

हेही वाचा – सोशल मीडियावर व्हायरल होतेय ‘कांदा भेंडी’, अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितली रेसिपी, पाहा व्हिडीओ

३. चवीसाठी या गोष्टी वापरा
हलवाई स्टाईल जिलेब्यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांची वेगळी चव. जिलेब्यांना सुगंध आणि सुंदर केशरी रंग देण्यासाठी केशराचा वापर केला जातो. याशिवाय वेलची किंवा गुलाबपाणी देखील याच कारणासाठी वापरता येते.

४. पीठ आंबू द्या
एकदा पीठ तयार झाल्यावर, ते रात्रभर काही तास आंबायला ठेवावे असा सल्ला दिला जातो. ही प्रक्रिया पिठात चव पूर्णपण मुरण्यास आणि हवेशी संपर्कात ठेवण्यास सक्षम करते, परिणामी जिलेबीचा पोत मऊ होतो.

५. साखरेचा पाक व्यवस्थित बनवा
जिलेबीचे आकर्षण म्हणजे त्यांचा पाक, पाकसाठी योग्य चव असणे महत्वाचे आहे. जिलेबीची चव त्यावर अवलंबून असते.. हलवाईसारख्या जिलेबीसाठी पाक साखरेचा पाक पातळ आणि घट्ट बनवा.

हेही वाचा- जगातील सर्वात महागडं चीज! फक्त एक तुकडाच २७ लाखांना विकला, जाणून घ्या सविस्तर

६ मंद आचेवर बनवा जिलेबी
जिलेबी बनवण्यासाठी आच मंद असावी. त्यांना मोठ्या आचेवर तळल्यास, आतील भाग कच्चा असतो आणि बाहेरील आवरण करपते. मंद ते मध्यम आचेवर ठेवल्याने स्वयंपाक करणे सोपे होते.

Story img Loader