Tiranga Shahi Rice : २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस आपण उत्साहाने साजरा करतो. या दिवशी देशाचा प्रत्येक नागरिक देशावरील प्रेम व्यक्त करतो. तुम्ही प्रजासत्ताक दिनी खायला काय खास बनवणार आहात? जर तुम्हाला काही सुचत नसेल तर तुम्ही ही आगळी वेगळी रेसिपी बनवू शकता. तुम्ही शाही राईस बनवू शकता. प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही या शाही राईसला तिरंगाचा लूक देऊ शकता. तिरंगा शाही राईस कसा बनवायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य
- बासमती तांदूळ
- गाजरची बारीक केलेली पेस्ट
- पालकची पेस्ट
- आलं लसणाची पेस्ट
- बारीक चिरलेला कांदा
- दालचिनी
- तेजपत्ताl
- लवंग
- मिरी
- काजू
- हिरवी मिरची
- तेल
- चवीनुसार मीठ
हेही वाचा : Spinach Omelette : पालकचे ऑम्लेट कधी खाल्ले का? जाणून घ्या ही हटके रेसिपी
कृती
- सुरूवातीला बासमती तांदूळ वाफवून घ्यावा
- एक कढई गॅस वर ठेवा आणि त्यात तेल गरम करा
- त्यानंतर त्यात tejpatta, लवंग, मिरी, काजू परतून घ्या.
- त्यानंतर त्यात कांदा टाका आणि चांगला परतून घ्या.
- त्यात चवीनुसार मीठ घाला
- आलं लसणाची बारीक केलेली पेस्ट घाला.
- कांदा नीट भाजून घेतल्यानंतर त्यात भात टाकून घेऊ या.
- भात नीट एकत्रित केल्यानंतर या भाताचे तीन भाग करा.
- त्यानुसार प्रत्येक भागाला आपल्याला रंग देता येईल.
- सुरूवातीला गॅसवर एक कढई ठेवा. त्यात हा तीन भागा पैकी एक भात टाका आणि त्यात गाजारची बारीक केलेली पेस्ट टाका आणि चांगले एकत्रित करा. भाताला केशरी रंग येईल. हा भात एका पातेल्यात काढून ठेवा.
- त्यानंतर हीच कढई नीट स्वच्छ धुवून घ्या.
- पुन्हा ही कढई गॅसवर ठेवा आणि कढईत तेल टाका. त्यानंतर तेल गरम झाले की त्यात बारीक केलेली पालकाची पेस्ट टाका.
- त्यानंतर त्यात भाताच्या तीन भागांपैकी दुसरा भाग टाका. आणि चांगले एकत्रित करा.
- भाताला हिरवा रंग येईल.
- हा हिरवा रंगाचा भात एका पातेल्यात काढा.
- आता आपल्याकडे तीन रंगाचे भात आहे. केशरी पांढरा आणि हिरवा.
- एका प्लेटमध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा या रंगांच्या अनुक्रमे हा भात सर्व्ह करा.
- चवीला अप्रतिम असलेला तिरंगा शाही राईस तयार होईल..