तुम्हाला अंडे खायला आवडते का? अंडी खाणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत हे सर्वांनाच माहित आहे., म्हणूनच प्रौढ आणि मुलांच्या आहारात अंड्यांचा समावेश करण्याची शिफारस आरोग्य तज्ज्ञ करतात. विशेषत: हिवाळ्यात अंडी खाण्याची शिफारस जास्त केली जाते कारण ते तुमचे शरीर उबदार ठेवतात आणि तुम्हाला पोषण देते. याशिवाय लोकांना अंड्याची चवही खूप आवडते. जर तुम्हाला देखील अंडी खायला आवडत असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. कोणाला अंड्याचे ऑम्लेट आवडते किंवा उकडलेली अंड्याची रस्स आवडतो. कोणाला फक्त उकडलेली अंडी मीठ-तिखट लावून आवडतात. याशिवाय काहींना अंड्याची भूर्जी आवडते तर काहींना अंडा घोटाला आवडतो तो उकडलेल्या अंड्यापासून तयार केला जातो. आज अशीच एक अंड्याची हटके रेसिपी जाणून घेणार आहोत.
अंडा घोटाला करताना अंडे उकडून त्याचे बारीक तुकडे केले जातात आणि भूर्जीसाठी कांदा टोमॅटो तिखट मीठ, मसाले टाकून केली जाते. पण अंडा लबाबदार रेसिपी थोडी वेगळी आहे. रस्सा भाजी करताना सहस अंडी उकडून मगच वापरली जातात पण या रेसिपीमध्ये ग्रेव्हीमध्ये कच्चे अंडे टाकले जाते. चला तर मग जाणून घेऊ या…
अंडा लबाबदार रेसिपी
साहित्य
कांदा, टोमॅटो, काजू, आले, लसून, बटर, कडीपत्ता, लाल तिखट, धने-जिरे पावडर, मीठ, हळद, पावभाजी मसाला, कोथिंबीर, अंडे, पाणी
कृती
प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात चिरलेला कांदा- टोमॅटो घ्या. त्यात आले-लसून आणि काजू टाका. थोडेसे पाणी टाकून मिश्रण चांगले वाटून घ्या. आता खोलगट पॅनमध्ये बटर टाका त्यात कडीपत्ता खुडून टाका आणि त्यात तयार कादां टोमॅटोची प्युरी टाका. काही वेळ चांगली परतून घ्या. आता त्यात लाल धने-जिरे पावडर, तिखट, हळद, मीठ, पावभाजी मसाला टाकून चांगले परतून घ्या. झाकण ठेवून त्याला वाटण चांगले पचू द्या. झाकण काढून त्यात थोडे पाणी टाका. चार-पाच कच्ची अंडी फोडून त्यात टाका. त्यावर किंचित तिखट मीठ टाका, चिरलेली कोथिंबीर टाका आणि झाकण ठेवून अंडे शिजू द्या.
काही वेळाने कच्चे अडे शिजेल.
अंडा लबाबदार तयार आहे. गरमा गरम चपाती किंवा भाकरी बरोबर त्याचा आस्वाद घ्या.