Oats Poha: अलीकडे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ओट्सचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. ओट्स हा असा पदार्थ आहे, जो थोडा खाल्ला तरी लगेच पोट भरते. ज्यामुळे आपले वजनही आपोआप नियंत्रणात राहते. ओट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते. काही जण ओट्स दुधासोबत खातात, पण सतत तेच तेच खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही ओट्सचे चविष्ट पोहे नक्की ट्राय करून पाहा…

ओट्सचे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ३ वाटी ओट्स
  • २ कांदे (बारीक चिरलेले)
  • २ टोमॅटो (बारीक चिरलेले)
  • ५-६ मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • चिरलेली कोथिंबीर
  • ८-९ कढीपत्याची पानं
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा मोहरी
  • १/२ चमचा हळद
  • मीठ (चवीनुसार)
  • तेल आवश्यकतेनुसार

ओट्सचे पोहे बनवण्याची कृती:

हेही वाचा: बटाट्याच्या झणझणीत ठेचा नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती

How To Make Diwali special Oreo Fudge Balls
Diwali Special Laddoo : यंदा दिवाळीला फक्त २ पदार्थ वापरून करा असा लाडू ; गोड काय बनवायचं याचं टेन्शनचं होईल दूर
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Diwali Special protein laddoos Recipe In Marathi
Diwali Special Protein Laddoos : यंदा दिवाळीत बनवा भरपूर प्रोटीन असणारे लाडू, फक्त ‘या’ चार बिया अन्…; तुमचे लाडू झटपट तयार
How to Prepare Sugandhi Utane at Home in Marathi
Sugandhi Utane at Home : यंदा दिवाळीत घरच्या घरी तयार करा सुगंधी उटणे, जाणून घ्या सोपी पद्धत, पाहा Video
fake sindoor kumkum Special tips
भेसळयुक्त कुंकू कसे ओळखावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स
The ultimate vitamin cheat sheet: Top foods packed with vitamins A to K for better health
केस गळतात? चिडचिड होते? ‘या’ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता; कोणते व्हिटॅमिन्स शरीरात काय काम करतात? घ्या जाणून…
Are you tired of cleaning the fridge
तुम्हालाही फ्रिज साफ करायचा कंटाळा येतो? ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने फ्रिज राहील नेहमी फ्रेश
How to properly clean your chopping board
Chopping Board : तुम्हीसुद्धा भाज्या कापण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरता का? मग डॉक्टरांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
  • सर्वात आधी गरम कढईत तेल ओतून त्यात मोहरी, जिरे आणि कांदा घालून परतून घ्या.
  • आता त्यात टोमॅटो, मिरच्या, कढीपत्ता आणि हळद घालून हे मिश्रण पुन्हा परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात ओट्स घालून त्यावर चवीनुसार मीठ घाला.
  • आता या मिश्रणावर थोडसं पाणी शिंपडून त्यावर झाकण घाला.
  • २-३ मिनिटांनी झाकण काढून त्यावर कोथिंबीर घालून गरमागरम ओट्सचे पोहे सर्व्ह करा.