Oats Poha: अलीकडे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ओट्सचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. ओट्स हा असा पदार्थ आहे, जो थोडा खाल्ला तरी लगेच पोट भरते. ज्यामुळे आपले वजनही आपोआप नियंत्रणात राहते. ओट्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते. काही जण ओट्स दुधासोबत खातात, पण सतत तेच तेच खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही ओट्सचे चविष्ट पोहे नक्की ट्राय करून पाहा…

ओट्सचे पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ३ वाटी ओट्स
  • २ कांदे (बारीक चिरलेले)
  • २ टोमॅटो (बारीक चिरलेले)
  • ५-६ मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • चिरलेली कोथिंबीर
  • ८-९ कढीपत्याची पानं
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा मोहरी
  • १/२ चमचा हळद
  • मीठ (चवीनुसार)
  • तेल आवश्यकतेनुसार

ओट्सचे पोहे बनवण्याची कृती:

हेही वाचा: बटाट्याच्या झणझणीत ठेचा नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती

  • सर्वात आधी गरम कढईत तेल ओतून त्यात मोहरी, जिरे आणि कांदा घालून परतून घ्या.
  • आता त्यात टोमॅटो, मिरच्या, कढीपत्ता आणि हळद घालून हे मिश्रण पुन्हा परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात ओट्स घालून त्यावर चवीनुसार मीठ घाला.
  • आता या मिश्रणावर थोडसं पाणी शिंपडून त्यावर झाकण घाला.
  • २-३ मिनिटांनी झाकण काढून त्यावर कोथिंबीर घालून गरमागरम ओट्सचे पोहे सर्व्ह करा.