Sweet Potato Sheera Recipe: सध्या श्रावण महिना सुरू असून या महिन्यात अनेकजण उपवास करतात. अशावेळी सतत साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही रताळ्याचा शिरा नक्कीच बनवू शकता. रताळ्याचा शिरा आरोग्यासाठी पौष्टिक आणि चवीलाही खूप छान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ मोठे रताळे
  • ३ चमचा तूप
  • ३ चमचा साखर
  • मीठ (गरजेनुसार)
  • मिक्स ड्रायफ्रुट (गरजेनुसार)

रताळ्याचा शिरा बनवण्याची कृती:

हेही वाचा: अवघ्या १५ मिनिटांत बनवा ओट्स पनीर टिक्की; नोट करा साहित्य आणि कृती

  • सर्वात आधी रताळी स्वच्छ धुवून उकडून घ्या.
  • त्यानंतर त्याची साल काढून स्मॅश करून घ्या.
  • आता दुसरीकडे एका गरम कढईत तूप घालून त्यात स्मॅश केलेल्या रताळ्याचा गर घालून व्यवस्थित परतून घ्या.
  • आता ४-५ मिनिट परतल्यानंतर त्यात साखर घाला.
  • या संपूर्ण मिश्रणात साखर विरघळल्यानंतर त्यावर ड्रायफ्रुट घालून गॅस बंद करावा.
  • गरमागरम रताळ्याचा शिरा सर्व्ह करा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tired of eating sago khichdi during fast then make sweet potato sheera note the ingredients and recipe sap