तुमच्यापैकी कित्येकजण आरोग्याची काळजी घेणारे असतील त्यांना तुम्ही रताळे खाताना नेहमी पाहिले असेल. आरोग्य तज्ज्ञदेखील रताळं रोज खाण्याचा सल्ला देतात. रताळ्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत पण कित्येक लोकांना रोज रताळे खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच तुमच्यासाठी आम्ही एक सोपी कटलेट तयार करण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही हेल्दी आणि चविष्ट रताळ्याचे कटलेट तयार करू शकता.
रताळ्याची रेसिपी
साहित्य
रताळे – ४
चाट मसाला – १ चमचा
आमचूर पावडर -१ चमचा
लिंबाचा रस -१ चमचा
जीरा पावडर -१ चमचा
गरम मसाला – १ चमचा
हिरवी मिरची- आल्याची पेस्ट – १ चमचा
बेसन – १ वाटी
तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार
मीठ- चवीनुसार
हेही वाचा – संध्याकाळच्या चहासह खा कुरकुरीत Onion rings! झटपट होईल तयार, जाणून घ्या सोपी रेसिपी
कृती
- रताळे ओव्हनमध्ये मऊ आणि शिजेपर्यंत भाजून घ्या. शिजवलेले रताळे साल काढून रताळे मॅश करा.
- त्यातचाट मसाला, आमचूर पावडर, लिंबाचा रस, जिरेपूड, गरम मसाला, हिरवी मिरची-आले पेस्ट आणि बेसन टाका.
- आता याला लहान टिक्कीचा आकार द्या आणि तव्यावर थोडं तेल टाकून भाजून घ्या
- रताळ्याचे कटलेट तुमच्या आवडीच्या चटणी किंवा सॉससोबत खा.