Kalingad Thalipeeth Recipe: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून या दिवसात आंबा, कैरी, कलिंगड ही फळं मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. आंबा आणि कैरीपासून आपण नेहमीच विविध पदार्थ ट्राय करत असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कलिंगडापासून एक हटके रेसिपी कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही कलिंगड थालीपीठाची जबरदस्त रेसिपी तुमच्या मुलांनाही आवडेल. शिवाय ती पौष्टिकही आहे. चला तर जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कलिंगड थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

१. ३ वाटी कलिंगडातील पांढऱ्या भागाचा किस
२. ३ वाटी थालीपीठ भाजणीचे पीठ
३. ३ चमचे आलं-लसूण पेस्ट
४. १ चमचा हळद
५. १ चमचा कसूरी मेथी
६. १ चमचा ओवा
७. तिखट चवीनुसार
८. मीठ चवीनुसार
९. तूप आवश्यकतेनुसार

कलिंगड थालीपीठ बनवण्याची कृती :

हेही वाचा: फक्त मुलांनाच काय तुम्हालाही आवडेल, चटपटीत रवा कचोरी; नोट करा साहित्य अन् कृती

१. सर्वात आधी एका मोठ्या परातीत थालीपीठ भाजणीचे पीठ घ्यावे आणि त्यात हळद, तिखट, मीठ, आलं लसणाची पेस्ट, ओवा व कसूरी मेथी टाकावी.

२. त्यानंतर त्यात कलिंगडाचा किस मिक्स करावा आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यावे. यावेळी त्यात पाणी टाकू नये.

३. काही वेळाने कलिंगड थालीपीठ थापून घ्यावे.

४. त्यानंतर ते गरम तव्यावर तूप टाकून खरपूस भाजून घ्यावे.

५. तयार गरमा गरम कलिंगड थालीपीठाचा दह्यासोबत आस्वाद घ्यावा.