Easy Tomato Rasam in Cooker: भाताबरोबर डाळ नको असेल, किंवा कंटाळा आला असेल तर, एकदा साऊथ इंडीयन स्टाईल टॉमेटो रस्सम तयार करून पाहा. टॉमेटो रस्सम हा पदार्थ चवीला चटकदार असून, तयार करायलाही सोपा आहे. भारतातल्या घराघरांमध्ये फक्त नाश्त्यालाच नाही तर दोन्ही वेळच्या जेवणांमध्येही आवडीनं खाल्ले जाते. चला तर मग टॉमेटो रस्सम करण्याची सोपी कृती पाहूयात…

कटाचं टोमॅटो रस्सम साहित्य

४ टोमॅटो मध्यम आकाराचे
२-३ कप कट / पाणी
१-२ पाकळ्या ठेचलेली लसूण (ऐच्छिक)
चिंचेचा कोळ टीस्पून (जरूर पडल्यास)
१ टीस्पून धने पावडर
१/२ टीस्पून जीरे पावडर
१/२ टीस्पून काळी मिरी पावडर
२ टीस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टीस्पून तूप / तेल
१/४ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून जिरं
५-६ मेथी दाणे
१/४ टीस्पून हळद
चिमूटभर हिंग
७-८ कढीपत्ता पानं
१-२ सुक्या लाल मिरच्यामधे चीर देऊन
मीठ चवीनुसार

कटाचं टोमॅटो रस्सम कृती

१. कटाचं टोमॅटो रस्सम बनवण्यासाठी सर्वात आधी टोमॅटो बारीक चिरून घ्या.

२. एका पातेल्यात तूप / तेल गरम करून मोहरी, जिरं, मेथी दाणे, हळद, हिंग, लाल मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी करा.

३. त्यात टोमॅटो घाला आणि २-३ मिनिटं चांगलं परतून घ्या.

४. मीठ घाला. झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. शिजताना पाणी घालू नका. चमच्याने टोमॅटो मॅश करून घ्या.

५. कट / पाणी घालून एक उकळी काढा. त्यात धने पावडर, जीरे पावडर, मिरी पावडर, लसूण आणि चिंचेचा कोळ घाला. ४-५ मिनिटं उकळून घ्या.

६. पाणी घालून रस्सम हवे तेवढे पातळ करून घ्या. चिरलेली कोथिंबीर घालून १ मिनिट उकळा.

हेही वाचा >> Shravan special: श्रावण स्पेशल साबुदाणा बासुंदी; एकदा खाल तर खातच रहाल

७. चविष्ट टोमॅटो रस्सम तयार आहे. गरमागरम रस्सम सूप म्हणून सर्व्ह करा किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.