सध्या फास्टफूड खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कित्येक लोकांना हाका किंवा शेजवान अशा चायनिज नूडल्स खायला आवडतात. पण या नूडल्स आरोग्यासाठी फायेदशीर आहेत का नाही याचा मात्र विचार कोणीच करत नाही. कित्येक जणांना चायनिज नूडल्स खाण्याऐवजी देशी नूडल्स खायला आवडतात. फास्ट फूडच्या नादात कित्येक लोक आपल्याकडी पांरपारिक पदार्थ खाणे विसरत चालले आहेत. आपल्याकडे गेल्या कित्येक वर्षांपासून तयार होणाऱ्या गव्हाच्या शेवया या देखील एक प्रकारच्या नूडल्स आहेत. तुम्हाला जर गव्हाच्या शेवया खायच्या असतील आमच्याकडे एक सोपी रेसिपी आहे. गव्हाच्या शेवया वेगवगेळ्या पद्धतीने केल्या जातात आणि त्यांची चव देखील चांगली आहे. चला तर मग जाणून घेऊ या देशी नूडल्स म्हणजे गव्हाच्या शेवयांची सोपी रेसिपी
देशी नूडल्स / गव्हाच्या शेवयांची रेसिपी
साहित्य- गव्हाच्या शेवया १ वाटी, लसूण १४-१६ पाकळ्या बारीक चिरलेल्या, लोणी २ चमचे, गाईचे तूप ३ चमचे, सैंधव चवीपुरते, कोथिंबीर २ चमचे.
कृती – सर्वप्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात २ चमचे तूप आणि थोडे सैंधव टाकून एक उकळी आणा. उकळी आल्यावर त्यात शेवया न तोडता टाका आणि ५-७ मिनिटे थोडे शिजेपर्यंत उकळू द्या. गाळणीतून शेवयांमधील पाणी काढून टाका, तसेच थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. एका कढईत लोणी गरम करून त्यात १ चमचा तूप टाका, थोडे गरम झाले की बारीक चिरलेला लसूण टाका. लालसर रंगाचे झाले की त्यात शेवया टाकून हळुवारपणे परतून घ्या. आवडत असल्यास वरून कोथिंबीर भुरभुरा,