तुम्हाला गोड पदार्थ खायला आवडतात का? मग तुमच्यासाठी आमच्याकडे एक रेसिपी आहे. तुम्हाला हेल्दी राहायला आवडतं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. मिश्र धान्यांची खीर! अनेकांना खीर खायला आवडते. पण तुम्ही कधी मिश्र धान्यांची खीर खाऊन पाहिली आहे का? नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. ही खीर अत्यंत चविष्ट आहे. तुमच्या मुलांनाही ही खीर नक्की आवडेल. विशेष म्हणजे ही खीर बनवणे अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊ या रेसिपी
मिश्र धान्यांची खीर रेसिपी
साहित्य –
नाचणी, राजगिरा आणि मुगाची भरड ३ चमचे, अर्धा कप दूध, खसखस पाव चमचा, गाजर किसून २ चमचे, २-३ चमचे ओला नारळ, खजूर पेस्ट / खारीक पावडर, तूप १ चमचा, रताळे किसून ४ चमचे, चवीपुरती साखर/ गूळ. (शक्यतो गूळ व खारीक पावडर वापरा.) वेलची- जायफळ पूड.
हेही वाचा – आषाढीच्या उपवासाकरिता साबुदाना नको? मग राजगिरा पिठाचे थालिपीठ खा! टेस्टी आणि हेल्दी, ही घ्या रेसिपी
कृती –
तुपावर भरड भाजून, त्यात रताळे व गाजर कीस घाला. त्यात थोडे पाणी घालून शिजवा. मग त्यात दूध, ओला नारळ घालून शिजवा. नंतर वेलची जायफळ, खसखस घालून उकळी आणा, खीर तयार होईपर्यंत सतत चमच्याने ढवळत रहा, म्हणजे दूध फाटत नाही.