आहारात मटकीचा आवर्जून समावेश केला जातो. कारण मटकी फक्त भाजी किंवा उसळ करण्यापुरतीच मर्यादित नाही तर ती शरीरासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. मधुमेह असेल तर मोड आलेली मटकी खाण्याचा सल्ला हमखाल दिला जातो. शिवाय मटकीतील पोटॅशियममुळं रक्तवाहिन्या सुरळीत काम करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात. त्यामुळे अनेक स्त्रीया घरात स्वयंपाकात मटकीचा एखाद्या पदार्थात तरी समावेश करतात. पण अनेकांनी मटकीचे काही पदार्थ खायला आवडत नाहीत.
अशा लोकांसाठी आज आम्ही एक खास रेसिपी सांगणार आहोत ज्यामुळे ते अगदी आवडीने मटकी खातील यात शंका नाही. हो कारण, झणझणीत मसाला, पोह्यांचा चिवडा, कांदा, टोमॅटो अशा पदार्थांपासून जर तुम्हाला चटपटीत, चवीला रुचकर अशी मटकी भेळ खायला दिली तर ती नक्की आवडेल. तर चला जाणून घेऊया मटकी भेळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि ती बनवण्याची कृती.
हेही वाचा- झटपट रक्त वाढवणारी टेस्टी बिटाची कोशिंबीर! ‘या’ दोन पद्धतीने नक्की ट्राय करा
मटकी भेळसाठी लागणारं साहित्य –
- भिजलेली मटकी २ वाट्या
- पोह्यांचा चिवडा १ वाटी
- साळीच्या लाह्या २ वाट्या
- सैंधव चवीनुसार
- कांदा १, टोमॅटो २, कोथिंबीर आणि तेल
हेही वाचा- उन्हाळ्यात स्वतःला थंड ठेवण्यासाठी घरच्याघरी बनवा ‘आंबा सरबत’, जाणून घ्या सोपी रेसिपी
कृती – एका पातेल्यात तेल गरम करून त्यात भिजलेली मटकी व सैंधव घाला, त्यानंतर मटकी कुरकुरीत होईपर्यंत परतावा. तयार मटकीत वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या, अशा प्रकारे मटकी भेळ लगेच तयार होईल. हा पण लक्षात असुद्या मटकी भेळ कुरकुरीत होण्याकरिता त्यामध्ये टोमॅटो सर्वात शेवटी घाला.
उपयोग – रुचिवर्धक .