How to make Beetroot Bhaji: एखादा पुलाव किंवा बिर्याणी बनवली की, त्याच्याबरोबर सॅलड हे हमखास असतं.यात काकडी,गाजर बरोबर बीट सुद्धा आवर्जुन दिले जाते. कारण अनेकांना बीट मनापासून आवडत नाही. त्याप्रमाणेच एखाद्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग द्यायचा असेल तर हमखास बीटाचा वापर केला जातो. बीटामुळे पदार्थाला लालचुटुक रंग येतो. त्याचप्रमाणे अनेक गृहिणी बीटापासून वेगवेगळे पदार्थ देखील बनवतात ; यामध्ये बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी, बीटाचे पराठे इत्यादी. तर आज आपण बीटाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर पाहुयात बीटाची भाजी कशी बनवायची ते.
साहित्य –
१. पाव किलो बीट
२. दोन कांदा
३. एक टोमॅटो
४. जिरं, मोहरी, कडीपत्ता
५. हळद, मीठ, तिखट मसाला
हेही वाचा…मूग डाळीचा बनवा ‘हा’ पौष्टीक पदार्थ; मऊ अन् पचायलाही हलका; साहित्य, कृती लगेच लिहून घ्या
कृती –
१. पाव किलो बीट बाजारातून आणा.
२. त्यानंतर बीट स्वछ धुवून घ्या व साल काढून घ्या.
३. नंतर बीट किसून घ्या.
४. दोन कांदे, एक टोमॅटो बारीक चिरून घ्या.
५. कढई घ्या. त्यात एक चमचा तेल घाला व त्यात जिरं, मोहरी, कडीपत्ता घालून परतवून घ्या.
६. नंतर बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो घाला. कांदा, टोमॅटो जरासा लालसर झाला की त्यात तिखट मसाला टाका.
७. नंतर हळद, मीठ घाला.
८. नंतर किसून घेतलेला बीट घाला.
९. वाफेवर १० मिनिटे शिजू द्या.
१०. अशाप्रकारे तुमची बीटाची पौष्टीक भाजी तयार.
तुम्ही बीटाचे पराठे देखील बनवू शकता. रेसिपी लिहून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा…फक्त पाव किलो बीट वापरा अन् बनवा बीटाचा मऊसूत पराठा; पाहा सोपी रेसिपी
बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे –
बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. नावडतीचं हे बीट अत्यंत पौष्टिक असून ते खाण्याचे काही गुणकारी फायदे आहेत. हे फायदे नेमके कोणते ते जाणून घेऊ . बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे व खनिजे यांसारखे पोषक घटक भरपूर असतात. बीट हे प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर व जीवनसत्त्व क यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. नियमित आहारात बीटचा समावेश केल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि चयापचय वाढते.
© IE Online Media Services (P) Ltd