भेंडीची भाजी खूप लोकप्रिय आहे, अनेकजण ती आवडीने खातात. पण काहींना ही अजिबात आवडत नाही, भेंडीतील बुळबुळीतपणामुळे ही भाजी खाणे अनेकजण टाळतात. पण भेंडीपासून अनेक पदार्थ तयार केले जातात. यात कुरकुरीत भेंडी, दही भेंडी, मसाला भेंडी, भेंडी फ्राय, भरलेली भेंडी असे पदार्थ चवीने खाल्ले जातात. भेंडी चवीला चिकट असली तरी त्यात शरीरासाठी आवश्यक अनेक पौष्टिक घटक असतात. पण घरी भेंडीची रोज तिच मिळमिळीत भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही भेंडीचा झणझणीत ठेचा नक्की ट्राय करु शकता. आतापर्यंत तुम्ही मिरचीचा ठेचा ऐकला असे पण भेंडीचा ठेचा पहिल्यांदाच ऐकला असेल, चला तर मग जाणून घेऊ भेंडीचा ठेचा बनवण्याची रेसिपी….

भेंडीचा ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

• शेंगदाणे १/२ वाटी
• भेंडी पांव किलो
• हिरव्या मिरच्या १०-१२
• लसूण ७-८ पाकळ्या
• जिरे १/२
• मीठ चवीनुसार
• तेल २-३ tsp
• हिंग १/२ tsp
• लिंबाचा रस १/२ लिंबू

भेंडीचा ठेचा बनवण्याची कृती

सर्वप्रथम कढईत १/२ वाटी शेंगदाणे भाजून प्लेटमध्ये वाटून घ्या. यानंतर कढईत दोन चमचे तेल गरम करा, तेल चांगले गरम होताच त्यात १० ते १२ तिखट आणि कमी तिखट अशा मिरच्या भाजून घ्या. यानंतर ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, १ चमचा जिरं चांगले परतून घ्या.

यानंतर यातील मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या प्लेटमध्ये काढा आणि त्यात तेलात चिरलेली भेंडी टाका आणि चिकटपणा जाईपर्यंत भाजून घ्या. आता गॅस बंद करा.

यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे आणि जिर, मिरची आणि लसूण टाकून जाडसर वाटून घ्या. यानंतर त्या भाजलेली भेंडी आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा सर्व मिश्रण जाडसर वाटून घ्या.

यानंतर पु्न्हा कढईत दोन चमचे तेल गरम करुन घ्या आणि त्यात मिक्सरने वाटून तयार केलेला खरटा मंद आचेवर भाजून घ्या. यात तुमच्या आवडीनुसार लिंबाचा रस टाकू शकता. अशाप्रकारे तयार झाला झणझणीत भेंडीचा ठेचा.

Story img Loader