घरी कोणताही खास कार्यक्रम असेल तर जेवणासाठी पनीरचा बेत ठरलेला असतो. पनीर जवळजवळ सर्व घरांमध्ये नेहमी तयार केला जाणारा पदार्थ आणि बहुतेक लोकांना ते खायला आवडते. पण तुम्हाला नेहमी दुधाचे पनीर खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही सोयाबीनचे पनीर खाऊन पाहू शकता. सोया पनीर भरपूर प्रथिनांनी समृद्ध आहे. सोया पनीरच्या भाजीची चव काहीशी नॉनव्हेज सारखी असते, अशा परिस्थितीत ज्यांना नॉनव्हेज आवडते ते सुद्धा हे खूप आवडीने खातात. आज आम्ही तुम्हाला सोया पनीरच्या भाजीची रेसिपी सांगणार आहोत. या रेसिपीच्या मदतीने तयार केलेल्या सोया पनीरची चव इतकी अप्रतिम आहे की तुम्हाी नॉनव्हेजची चव विसराल.
सोया पनीरची भाजी आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला सोया पनीरची भाजी करायची असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. नव्याने जे स्वयंपाक करायला शिकत आहेत ते देखील ही सोया पनीरची भाजी अगदी सहज तयार करू शकतात. चला जाणून घेऊ या.
सोया पनीरची भाजीची रेसिपी.
सोया पनीरसाठी साहित्य
सोया पनीरचे चौकोनी तुकडे – २ वाटी
टोमॅटो – २
कांदा – २
लसूण-हिरवी मिरची पेस्ट – 2 टीस्पून
लाल तिखट – 2 टीस्पून
हळद – १/२ टीस्पून
धने पावडर – १ टीस्पून
जिरे पावडर – ३/४टीस्पून
काश्मिरी लाल तिखट – १ टीस्पून
पनीर मसाला – १ टीस्पून
संपूर्ण जिरे – १ टीस्पून
हिरवी धणे पाने – २-३ चमचे
तेल – आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
हेही वाचा : मशिनशिवाय घरीच कसा तयार करावा उसाचा रस, जाणून घ्या सोपा जुगाड
सोया पनीर कशी करायची?
सोया पनीर तयार करण्यासाठी प्रथम पनीर घ्या आणि त्याचे १-१ इंच चौकोनी तुकडे करा. यानंतर कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यावर त्यात पनीरचे तुकडे टाका आणि मंद आचेवर हलके तपकिरी होईपर्यंत तळा. पनीर तळून झाल्यावर एका भांड्यात काढून बाजूला ठेवा. यानंतर टॉमॅटो कापून मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून प्युरी तयार करा. एका भांड्यात प्युरी काढून ठेवा.
आता कढईत आणखी थोडे तेल टाकून त्यात जिरे टाकून तळून घ्या. जिरे तडतडायला लागल्यावर त्यात कांद्याचे बारीक तुकडे घालून परतून घ्या. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परता. यानंतर त्यात टोमॅटोची प्युरी घालून शिजू द्या. प्युरीला हलकीशी उकळायला लागली की त्यात हळद, लाल तिखट, धनेपूड आणि इतर मसाले घालून शिजू द्या. यानंतर थोडे थोडे पाणी घालत रहा.
हेही वाचा : नाश्त्यासाठी बनवा गरमा गरम ‘बटाटा पोहा कटलेट’! अगदी सोपी आहे पद्धत, जाणून घ्या रेसिपी
जेव्हा ग्रेव्ही चांगली तयार होईल आणि चांगली उकळू लागेल तेव्हा आधी तळलेले पनीरचे तुकडे घालून ग्रेव्हीमध्ये चांगले मिसळा. भाजीमध्ये चवीनुसार मीठ घाला, आता कढई झाकून ठेवा आणि भाजी आणखी ५ मिनिटे शिजवा. शेवटी भाजीमध्ये पनीर मसाला आणि हिरवी कोथिंबीर टाका आणि गॅस बंद करा. चव आणि पौष्टिकतेने समृद्ध सोया पनीर तयार आहे. चपाती, पराठा किंवा भातासोबत सर्व्ह करता येते.