चिकन म्हणजे मांसाहारी खाणाऱ्या लोकांचा जिव्हाळ्याचा विषय. बटर चिकन, चिकन टिक्का, चिकन मसाला, चिकन कोल्हापुरी आदी चिकनचे पदार्थ पहिले की, आपसूकचं तोंडाला पाणी सुटतं. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास पदार्थ घेऊन आलो आहोत. हा पदार्थ बनवून तुम्ही तुमचा रविवार आणखीन खास करू शकता. तर या पदार्थाचे नाव आहे झणझणीत पारंपरिक पद्धतीत ‘चिकन खर्डा’. चला तर जाणून घेऊ चिकन खर्डाची सोपी रेसिपी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृती –

  • चिकन (पाव किलो)
  • मिरची
  • हळद
  • मिरची
  • आलं-लसूण
  • काजू
  • कोथिंबीर
  • गरम मसाला
  • मीठ

हेही वाचा…रविवारी करा नॉन व्हेजचा बेत; झणझणीत ‘कोळंबी फ्राईड राईस’ची ‘ही’ सोपी रेसिपी लगेच नोट करा…

साहित्य –

  • कुकरमध्ये तेल गरम करा आणि कांदा घालून चांगला परतवून घ्या.
  • त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद घालून मिक्स करा व एक मिनिटे सर्व परतवून घ्या.
  • त्यानंतर स्वछ धुवून घेतलेलं चिकन त्यात घाला आणि मग त्यात पाणी, मीठ घाला.
  • मिश्रण एकजीव करून घ्या आणि झाकण बंद करा व दोन-तीन शिट्ट्या होऊ द्या.
  • दुसरीकडे पॅनमध्ये लसूण, आवडीनुसार हिरव्या मिरच्या चिरून घाला .नंतर त्यात सुखं खोबरं घालून परतवून घ्या. गॅस बंद करा आणि मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
  • सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घाला, त्यात पाणी आणि कोथिंबीर घालून बारीक करून घ्या. अशाप्रकारे तुमचा खर्डा तयार.
  • नंतर दुसरीकडे कढईत तेल गरम करा. त्यात जिरे टाका आणि फोडणी द्या. कांदा, गरम मसाला घालून छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या.
  • मिक्सरमध्ये तयार करून घेतलेला खर्डा दोन मिनिटे पॅनमध्ये परतवून घ्या.
  • त्यानंतर त्यात शिजवलेले चिकनचे तुकडे घाला.सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
  • त्यानंतर फक्त ४-५ मिनिटे शिजवा.
  • अशाप्रकारे तुमचा चिकन खर्डा तयार.
  • हा चिकन खर्डा तुम्ही पोळी किंवा भाताबरोबर खाऊ शकता.